नायगाव| नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष रामकिसन पालनवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी रामकिसन पालनवार यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घाळून मार्गदर्शन केले संत गाडगेबाबा महाराज यांच्या चारित्र्यावर समाजाला एक चांगला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कार्य केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते व संत गाडगेबाबा महाराज यांनी कशा पद्धतीने समाज घडविण्याचे कार्य केले असल्याची माहिती सांगितली आहे. यावेळी सरपंच मिरकुटे व गजानन जुने व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.