नांदेड| विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जवळ्यात शिवज्ञान चाचणी घेवून छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी.एस., सरपंच कमलताई शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, आकाशवाणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, विकास गोडबोले यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम मुख्याध्यापक ढवळे जी.एस. यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे आणि सरपंच कमलताई शिखरे यांनी पुष्प व धूप पूजन करुन अभिवादन केले. त्यानंतर इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवज्ञान चाचणी घेण्यात आली. या चाचणीकरिता विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.