हिमायतनगरातील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल -NNL

चाकूचा धाक दाखवून लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद  


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या  व्यापारी युवकावर चाकू हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणी रात्री उशिरा हिमायतनगर पोलीस डायरीत आरोपीवर चाकूचा धाक दाखवून दिवसाढवळ्या लूटमार केली आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमायतनगर शहरात मागील काही महिन्यापासून युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे शुल्लक कारणावरून एकमेकांवर चाकू हल्ले करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. हि मनोविकृती हिमायतनगर शहराला एक वेगळ्या वळणावर नेत असून, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे अश्या प्रतिक्रिया जनमाणसातून पुढे येत आहेत. हिमायतनगर शहरातील नव्या पिढीवर पोलिसांची वचक राहिली नसल्याने आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काल चाकू हल्लाची घटना दि.२० रविवारी शहरातील बसस्थानक परिसरात सुरभी कोल्ड्रिंक्सचे संचालक प्रशांत देवकते यांच्यासोबत घडली आहे. 

त्यांनी हिमायतनगर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे कि, मी दुपारी ११ ते १२ वाजेच्या दरम्यान घराकडे जेवणासाठी जात होती. त्यावेळी अचानक समोर येऊन संतोष बंजेवाड याने रस्त्यात अडवून तू लई माजलास का...? तुझ्याकडं जास्त पैसे झाला का...? असे म्हणत आपल्याजवळील चाकू काढून माझ्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतली. तसेच चाकूचा धाक दाखवून खिशातील नगदी ४ हजार काढून घेतले. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने गेल्यावर चाकूने वार केला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

यावरून हिमायतनगर पोलीस डायरीत आरोपी संतोष बंजेवाड याच्या विरुद्ध कलम ३०७, ३९४,३४१ भादंवि अनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. घटना घडताच पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून लुटमारीसाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी हे करीत आहेत. 

भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे - आ. जवळगावकर हिमायतनगर शहरात पोलिसांची वचक कमी झाल्याने नागरिकात भितीचे वातारवरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यापासून शहर व ग्रामीण भागात घटनाचा क्रम वाढत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या घटना पुढे होणार नाहीत यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवर्ततील ठेचून अश्या घटना होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दि.२० फेब्रुवारीच्या या घटनेनंतर असे गुन्हे करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन गुन्हेगार प्रवृत्तीवर अंकुश आणणे गरजेचे आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरुन काय हालचाली करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यानी जिल्हा पोलिस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक कबाडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कालच्या घटनेची परिस्थिती वागत करून दिली. तसेच या घटनेचा केला. आ.जवळगावकर यांनी निषेध केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी