हिमायतनगर,अनिल नाईक| तालुक्यातील उमेश महाजन नामक दुचाकी मॅकेनिकने मुलाच्या हट्टापायी सायकलीला भंगार साहित्य बसवून त्यापासून पेट्रोलची मोटर सायकल बनवली आहे. कमीत कमी खर्चापासून बनलेल्या या मोटारसायकलीला पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. हि गाडी सध्या तालुक्यासह जिल्हयात चर्चेचा विषय बनला आहे.
किनवट- माहीर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे जवळगाव येथील उमेश महाजन हा दुचाक्या दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदार निर्वाह करतो आहे. अनेक वर्षपासून या व्यवस्यात असल्याने त्याने आत्तापर्यंत अनेक नादुरुस्त गाडयांना दुरुस्त करून त्यात जीव ओतला आहे. नुकतेच्या त्याच्या चिमुकल्याने बाबा माझ्यास्तहीही एक गाडी बनाव असा हट्ट धरला होता. मुलाच्या हट्ट पुरविण्यासाठी मेकैनिकाल उमेशने एक भंगार सायकल घेऊन त्या सायकलला पेट्रोलवर चालणारी दुचाकी तयार करून जीव ओतलाय.
हा अवसीहकार करण्यासाठी त्याला तब्बल सहा महिन्याचा कालावधी लागला असून, यासाठी त्याने आपल्या दुकानात भांगरमध्ये पडून असलेल्या टीव्हीएस मोटार सायकलचे विविध पार्ट एकत्रित करून स्वतचे डोके वापरून एका भंगार सायकलला पेट्रोलवर चालणारी मोटार सायकल बनविली आहे. त्यात तो यशस्वी झाला असून, त्याने तयार केलेली हि मोटारसायकल अंदाजे ५० ते ५५ कि. मी. पर्यंत धावते असे उमेश महाजन यांनी सांगितले आहे.