मारतळा| मौजे वाका ता.लोहा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाका अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 2022 राबविण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्र कापसी बु अंतर्गत उपकेंद्र वाका या गावी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम ० ते ०५ वर्षांच्या बालकांना पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला.
लहान वयामध्ये त्यांना अपंगत्व निर्माण होऊ नये म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेले राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम यावर्षी २७ फेब्रुवारी२०२२ रोजी या वाका गावी पल्स पोलिओ कार्यक्रम घेण्यात आला.या पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के.मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
आजच्या कार्यक्रमांमध्ये रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा. इरवंत सुर्यकार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पोलिओचा डोस पासून सुरुवात करण्यात आली. गावातील ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ दत्तराम हंबर्डे, तातेराव हंबर्डे व उपकेंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती सपना टोमके, आशा वर्कर सुनीता हंबर्डे, लाभार्थी कृष्णा हंबर्डे, कन्हैया हंबर्डे हे लाभार्थी उपस्थित होते.