5 लक्ष ५७ हजाराच्या मुद्येमालासह स्थानिक गुन्हे शाखेन घातल्या बेड्या
नांदेड, अनिल मादसवार| दि.21 फेब्रुवारी रोजी राजेश निवृतीराव लोणे यांचे शेतातील इंडज कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी बॅटरी बँक मधील आमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या किंमती 1 लक्ष 57 रुप्याचे अज्ञात आरोपीतानाही चोरून नेल्या होत्या. यावरून अर्धापुर पोलीस ठाण्यात गुरनं. 46/2022 कलम 381,34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. त्या बॅटऱ्या चोरणाऱ्या आरोपीना 24 तासाचे आत अटक करून त्यांच्याकडून 5 लक्ष ५७ हजाराच्या मुद्येमाल जप्त करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेन पथकाने केली आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी अभिनंदन केलं आहे.
अर्धापूर तालुक्यात घडलेल्या बैटरी चोरी प्रकरणाचा तपस लावून सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी स्था. गु. शा. येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथक तयार केले होते. आणि या पथकाने दिनांक 21/02/2022 रोजी टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणारा इसम मौजे लहान येथे असल्याबाबत खात्रीशिर माहीती व्दारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना नमुद इसमास पकडुन करण्यासाठी रवाना केले.
स्थागुशाचे पथकानी मौजे लहान येथील दाखल होऊन मोठ्या शिताफीने चोरटे 1) खंडु रामराव बाभुळकर वय 32 वर्षे रा लहान ता. अर्धापूर 2) गणेश रामराव बाणुळकर वय 27 वर्षे रा लहान ता अर्धापुर 3) संदीप सिध्दोजी वानोळे वय 24वर्षे रा लहान ता अर्धापूर 4) नवनाथा तानाजी मोहकर वय 32 वर्षे रा चेनापुर ता. अर्धापुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली. पॉलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दिनांक 21/02/2022 रोजी राजेश निवृतीराव लोणे यांचे शेतातील इंडज कंपनीचे टॉवर असलेल्या ठिकाणी बॅटरी बँक मधील आमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या किंमती 1,57,000/- रुपयाचे एका स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम एच 26 एन 4944 मध्ये टाकुन चोरुन नेले आणि मोहकर याचे शेतातील आखाडयावर ठेवल्याचे कबूल केले आहे.
त्यावरुन स्थागुशाचे 'पथकाने त्यांना ताब्यात घेवुन गुन्हयातील आमर राजा कंपनीच्या 24 बॅटऱ्या किंमती 1,57,000/- रुपयाचे व गुन्हयात वापरलेली स्कॉर्पाओ गाडी क्रमांक एम एच 26 एन 4944 किंमती 4,00,000- रुपये असा एकुण 5,57,000/- रुपयाचा माल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन मुद्येमाल व आरोपीतांना पोलीस ठाणे अर्धापुर यांचे ताब्यात गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे. नमुद आरोपीताकडुन अशाचप्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर विजय कबाडे, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेडचे व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि आशिष बोराटे, पोहेकॉ/ गंगाधर कदम, पो ना /सजिंव जिंकलवाड , विठल शेळके , पोकॉ / विलास कदम,चालक/शंकर केंद्रे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.