हिमायतनगर| शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेतील पहिली ते तिसऱ्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी शाळा सुरु होण्याच्या पूर्वी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मास्क वापरा, मास्क नाही... प्रवेश नाही असे फलक हाती घेऊन शाळेच्या गेटसमोर जनजागृती सुरु केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचा आदर्श हिमायतनगर शहरातील नागरिकांनी घेऊन मास्कसह कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असा संदेश यातून मिळतो आहे.
दोन वर्षानंतर शाळांना सुरुवात झाली आहे शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती दिसत आहे. कोरोणामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलं घरीच होती, शाळा बंद, मित्र नाही याचा परिणाम मुलांच्या आकलन क्षमतेवर झालेला आहे. या अनुषंगाने सर्व शिक्षकांची सहविचार सभा घेतली. आणि यावर्षी शाळा सुरू झाल्यानंतर पहिला दिवस पहिला आठवडा दुसरा आठवडा कसा असावा या विषयी चिंतन बैठका घेतल्या. आणि चर्चा आंती कृती आराखडा तयार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मनोरंजनाचा शिक्षणाकडे वळविले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत असून, शाळेमध्ये येताना मास्क लावूनच यावे अन्यथा प्रवेश नाही अशी जनजागृती दररोज सकाळी शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेच्या गेटबाहेर रोडवर उभे टाकून येथील पहिले ते तिसरीचे विद्यार्थी एक प्रकारे कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षणाचे जयहिंद म्हणत स्वागत केले जात आहे.
यासाठी येथील मुख्याध्यापक मु.अ एम जी संगमनोर यांच्या पुढाकारातून शिक्षक राजेश्वर चव्हाण सर, मुल्ला सर, सचिन जाधव सर, आला सर, रेश्मा बेगम, कोरेकलकर, चीबडे, शाकेर सर, मु.अ एम जी संगमनोर, संभाजी कदम, भीमराव हनवते, परमेश्वर बनसोडे, संजय पैलवाड, रायेवार, संतोष पोकलेवाड यासर्व शिक्षक मित्राच्या मदतीने शाळेत बालसभा, मनातले प्रश्न, करोना विरुध्द मास्क चळवळी, सामाजिक अंतर याबाबत जागरूकता तयार केली. यासोबत मनोरंजन, मौज, खेळ ज्ञान आणि कौशल्य विकास या क्रमाने नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांनी गजबजली असून, सकाळी शाळेत येणाऱ्या सर्वाना आणि रस्त्याने जाणार्यांना देखील कोरोनाबाबत एक प्रकारची जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहेत.