हिमायतनगर| तालुक्यातील दरेसरसम सेवा सहकारी सोयायटीची बिनविरोध निवड झाल्यानंतर येथील चेअरमनपदी निळकंठ राठोड तर उप चेअरमनपदी चंपतराव धुमाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अशी माहिती माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड यांनी दिली.
आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणूक होणार असल्याने प्रमुख पक्षाच्या राजकीय नेत्यांनी सोसयटीची निवडणूक प्रतिष्टेच्या केल्या आहेत. सध्या हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील सोसाट्याच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यापैकी हिमायतनगर सोसायटी निवडणूक हि २९ जानेवारी रोजी होणार असून, अन्य ठिकाणच्या निवडणुकांच्या हालचाली सुरु आहेत. आत्तापर्यंत हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम, कोठा ज, जवळगाव, कांडली, पवना, या ५ सोसायटीच्या निवडणूक या बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी अनेक सोसायट्या ह्या काँग्रेसच्या ताब्यात आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकिपैकी सिरंजनी सोसायटी शिवसेनेच्या ताब्यात गेली असून, कामारी हि सोसायटी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. हिमायतनगर सह तालुक्यातील इतर सोसायटी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना- काँग्रेसच्या दोन्ही राजकीय नेत्यांनी कंबर कसल्याने आगामी काळात होणाऱ्या सोसायटीच्या निवडणूका अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान आता बिनविरोध निवडण्यात आलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी निवडीला सुरुवात झाली असून, यात तालुक्यातील दरेसरसम सेवा सहकारी सोयायटीने प्रथम बाजी मारली असल्याचे दिसते आहे. येथील सोसायटीची बिनविरोध निवड झाल्यानंतर चेअरमन पदाची निवड नुकतीच करण्यात आली आहे. दरेसरसम सोसायटीच्या चेअरमन म्हणून निळकंठ राठोड तर उपचेअरमन म्हणून चंपतराव धुमाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी जि सदस्य सुभाष दादा राठोड, रामराव भिसे, आनंदराव पुनेवाड, जयवंतराव देशमुखे तसेच सेवा सहकारी सॊसायटीचे सर्व संचालक मंडळ ज्यात शेषराव महाराज, दिलीप रायपलवार, कान्ताराव राठोड, बन्सी जाधव, मांगीलाल राठोड, गुलाब राठोड, सुभाष देशमुखे , निर्मला बाई राठोड, सुरेखा पुनेवाड आदींची उपस्थिती होती.