मा. शिक्षण मंत्री वर्षा ताईंचा निर्णय स्वागतार्ह - स. रवींद्रसिंघ मोदी - NNL


 नांदेड|
महाराष्ट्रातील बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याविषयी मा. शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा ताई गायकवाड यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी प्रदान करणारा हा निर्णय आहे. अशी भावना  वरिष्ठ पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांनी एका प्रसिद्धि पत्रकाद्वारे केला आहे.

 राज्याचे शिक्षण मंत्री मा. वर्षा ताई गायकवाड यांनी येत्या दि. 24 जानेवारी पासून बारावी पर्यंतच्या सर्व शाळा सुरु करण्याचा निर्णय घोषित केल्याने हजारों शिक्षक आणि लाखांच्या संख्येत विद्यार्थ्यांत चैतन्य निर्माण होने साहजिकच आहे. मागील आठवडाभरात समस्त राज्यातून विविध संस्था, संघटना आणि व्यक्तिकरीतिया असंख्य लोकांनी राज्यातील शाळा सुरु करण्यात यावे अशी मागणी उचलून धरली होती. माझ्यावतीने देखील वर्तमान पत्राच्या माध्यमातून शाळा सुरु करण्याविषयी आवाहन करण्यात आले होते. 

महाराष्ट्रातील पालकांच्या, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांची शासनाने दखल घेत शाळा सुरु करण्याचा निर्णय घोषित केला. वरील निर्णयाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत मिळेल. तसेच घरी बसून शिक्षणापासून दूर होत चालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सकारात्मक प्रयत्न या द्वारे साध्य होईल. कोरोना संक्रमणाचा व्याप वाढलत चालले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडल आणि विशेषतः शिक्षण विभागाने उचलले पाऊल विद्यार्थ्यांच्या हिताचे आणि अधिकाराचे रक्षण करतील असा आत्मविश्वास वाढला असे स. रवींद्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे. शाळा सुरु होत असल्याने शाळा प्रशासन, विद्यार्थी आणि पालकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांना शाळेत मासिक स्वास्थ्य तपासणी शिविर आणि प्रबोधन शिविरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचे प्रयत्न करावे असे ही आवाहन करण्यात पत्रकार मोदी यांच्या वतीने आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी