हिमायतनगर तालुक्यातील १२ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कार्यक्रम सुरु -NNL

४ संस्था, बिनविरोध ८ संस्थांसाठी निवडणूक होणार


हिमायतनगर, अनिल मादसवार|
महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२१-२०२२ ते २०२६-२०२७ च्या हिमायतनगर तालुक्यातील १२ ठिकाणच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यापैकी तालुक्यातील ४ संस्था बिनविरोध झाल्या असून, ८ संस्थांसाठी निवडणूक होणार असून, ६ संस्थेच्या अंतिम प्रारूप याद्या प्रसिद्ध होणे बाकी असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. गाव पातळीवरील विविध समस्या सोडविण्यासाठी सोसायट्या कार्य करतात. प्रत्येक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्षे एवढा असतो, अनेक सोसायट्यांच्या कार्यकाळ संपल्या परंत्तू कोरोनाचा प्रभाव असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑगस्ट स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडल्या होत्या. दरम्यान दिलेली ही मुदत संपल्याने सहकार विभागाने निवडणुकांना पुन्हा स्थगितीची मुदतवाढ दिली नाही. यामुळे सहकार विभागाच्या निवडणुकीला कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने ठाकरे सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर निवडणुकीला वेग आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. हिमायतनगर तालुक्यात एकूण २२ सहकारी संस्था असून, त्यापैकी १२ सोसाट्याच्या निवडणुक कामकाजाला दि.१३ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीने सुरुवात झाली आहे. यातील ४ संस्था म्हणजे जवळगाव, कोठा ज., पवना, दरेसरसम या बिनविरोध निवडण्यात आल्या आहेत. तर सिरंजनी, धानोरा, कामारी, कांडली, हिमायतनगर, पोटा, दुधड, दाबधरी या ठिकाणच्या संस्थांसाठी निवडणूक होणार आहे. तसेच तालुक्यातील मंगरूळ, खडकी बा., कार्ला पी, पळसपूर, वाशी, एकंबा या सह ठिकाणच्या संस्थांच्या अंतिम प्रारूप याद्या प्रसिद्ध होणे बाकी आहेत. तर उर्वरित ४ सोसाट्याच्या याद्या पाठविण्याचे बाकी असल्याची माहिती तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्री एल.टी.डावरे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी