२६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या शूर-वीरांना हिमायतनगरात अभिवादन -NNL

सैनिक गणेश गव्हाणे यांनी केलं होत आयोजन


हिमायतनगर| शहरातील वॉर्ड क्रमांक १ मध्ये येणाऱ्या चवरे गल्लीत वीर सैनिक ग्रुपच्या वतीने २६/११ च्या हल्ल्यात शाहिद झालेल्या पोलिस अधिकारी, वीर जवान व पोलीस कर्मचाऱ्यांना अभिवादन करण्यात करून त्यांच्या शौर्याच्या गाथा विशद करण्यात आल्या.  

मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, कमांडो, होमगार्ड व नागरिक अशा १७५ जणांना प्राण गमवावे लागले होते. या घटनेला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने शनिवारी सायंकाळी हिमायतनगर शहरातील चवरे गल्लीत श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रथम हिमायतनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या हस्ते पुष्पांजली आणि दीप लावून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त सौ.पुष्पाताई खंबायतकर व निलेश चटने यांनी ‘तरुण पिढीमध्ये देशभक्ती निर्माण होण्याची गरज आहे. शहिदांना जे वीरमरण लाभले, त्यांनी जे धैर्य दाखविले, त्यामुळे आपण आज सुखाची झोप घेत आहोत. त्यांच्या स्मृती आपण कायम जतन करून ठेवल्या पाहिजेत. असे सांगून वीर मरण आलेल्या शहिदांना अभिवादन केले. यावेळी वीर जवान अमर रहें.. भारत माता कि जय..., जय हिंद, वंदे मातरम च्या घोषणा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


यावेळी सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी व्यंकटराव चवरे, साईनाथ कोमावार, बाळू अण्णा चवरे, सुरज दासेवार, राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, गणेश रच्चेवार. परमेश्वर भोयर, परमेश्वर बडवे, अनिल मादसवार, अनिल नाईक,  आदींसह या वॉर्डातील अनेक जेष्ठ, श्रेष्ठ नागरिक, युवक, बालके आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन येथील वीर सैनिक ग्रुपचे सैनिक गणेश गव्हाणे व त्यांच्या मित्रमंडळींनी केलं होत.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी