नांदेड| भारतीय संविधान हाच राष्ट्रीय ग्रंथ आहे. संविधानाच्या मूळ तत्वास काही लोक बाधा आणत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागृत राहीले पाहिजे असे प्रतिपादन माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले.
भारतीय संविधान संवर्धन समिती नांदेडच्या वतीने संविधान दिन महोत्सव साजरा करण्यात आला. संविधान दिन महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी श्याम निलंगेकर हे होते. नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर घेण्यात आलेल्या महोत्सवात नांदेड जिल्हा समाजकल्याण आयुक्त तेजस माळवदकर, डॉ. व्यंकटेश काब्दे, श्याम निलंगेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण केले.
त्यानंतर आयुक्त तेजस माळवदकर यांनी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन घेतले. यावेळी आरक्षण हक्क संवर्धन समितीचे सोपानराव मारकवाड, रेल्वे एम्प्लॉईज असोशियशनचे सेक्रेटरी विलास मुंगे, बाणाईचे इंजि. भालेराव, बामसेफचे मिलिंद भिंगारे, समाजकल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.
इंदिरा विद्यालय लालवाडी शाळेचे मुख्याध्यापक विनोद जाधव, श्रीमती द्रौपदा वाघमारे, ऋषिकेश निलंगेकर, भूषण वाघमारे, प्रिया वाघमारे बार्टीच्या श्रीमती साळवे, भारतीय संविधान संवर्धन समितीच्या अध्यक्षा श्रीमती तरन्नुम बेगम महंमद हनिप, उपाध्यक्ष दत्तात्रय अन्नमवाड, सचिव विनोद वाघमारे, सहसचिव गुणवंत एच. मिसलवाड, कोषाध्यक्ष टोपाजी काकडे, मारोतराव देगलूरकर, यशवंत थोरात, सत्यपाल नरवाडे यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी समाज कल्याण विभागातील डी.वाय. पतंगे, आर. सुरकूटलावार, बी.एच. दासरे, आर.डी. सूर्यवंशी, जी.पी. शेंबेटवाड, के.जी. कलूरकर, के.टी. मोरे, डी.जी. कदम, आर.एम. जाधव, डी.आर. दवणे, के.पी. जेटलावार, यु.ऐ. वाणूळे, के.बी. राठोड, व्ही.बी. बोराटे, व्ही.आर. गायकवाड, रहीम शेख, जी.एच. पांपटवार, व्ही.के. दुगाळे, आर.व्ही. पेंडकर, श्रीमती ए.आर. नरवाडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. यांच्यासह इतर खात्यातील बहुसंख्य कर्मचारी, अधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.