हदगाव,शे चांदपाशा| हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असतांना आमदार, खासदार, माजी आमदार, खासरांनी पीकाचे नुकसान बाबतीत संबधीत मंञी ते मुख्यमंत्री यांच्या पर्यत निवेदने दिली. शासनाकडे मदतीचे अहवान केले पण ना... शासनाचे आदेश ना... कुठल्याही प्रकारची मदतीची घोषणा झाली नाही. उलट हदगाव तालुक्यात ५५%पीक आनेवारी दाखवून शेतक-याच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार दिसुन येतो आहे.
संबंधित पीकविमा अधिकारी कृषि अधिकारी अन्य केवळ आमदाराला माहीती देवुन भेटत असल्याच्या फोटो काही ठराविक वृतमानपञात बातम्या दिसु लागतात. आता शेतक-याविषयी जिव्हाळा उंदड झाला आता मदतीचे काय ? असा प्रश्न ञस्त शेतक-यामध्ये होताना दिसुन येत आहे. हदगाव तालुक्यात २७ व २८ सप्टेबरच्या दरम्यान झालेल्या ढगफुटीमुळे पीकाचे होत्याचे नव्हते केले आहे. काढणीला आलेल सोयाबीन पाण्यात वाहुन गेला आहे. तालुक्यात अनेक शेतक-याच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन सोबत कापुस मुग उडीद या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोयाबीनला कोंब आले आहे त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. ज्याचे शेतमाल वाचला पण त्याची प्रत ढासळली आहे. परिणामी शेतक-याचा मालाला भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. लोकप्रतिनिधी कडुन केवळ पाहणी झाली पंचनामा कुठं करण्यात येत हे अध्याप प्रशासनाकडुन माहीती नाही. माञ हे प्रशासनाचे अधिकारी विद्यमान आमदाराला नेमकी कोणती माहीती देत असावी हे एक कोडच दिसुन येत आहे.
पालकमञ्याकडुन ही मदतीच्या बाबतीत स्पष्टता नाही
नादेड जिल्ह्याचे पालकमंञी आशोक चव्हाण हे सध्या नादेड जिल्ह्यातील देगलुर -बिलोली विधानसभेची पोटनिवडणुकीत गुंग असल्याने कदाचित् अचार संहीतेचे कारणही पुढं येवु शकत. मात्र शेतकऱ्यांना शासनाकडुन मिळणाऱ्या मदतीकडे लक्ष लागले आहे. जिल्याचे पालकमंञी, आमदार व खासदार हे मदतीच्या अनुषंगाने काही घोषणा करतील अशी अपेक्षा शेतक-याना आहे. पण अध्यापही या बाबतीत काहीच हलचल दिसुन येत नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.