हिमायतनगर,अनिल नाईक| मागील पंधरा दिवसापासून सुरू झालेल्या अतिवृष्टी व गुलाबी चक्रीवादळामुळे मराठवाड्यासह पूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच हिमायतनगर तालुक्यात सुद्धा शेतकऱ्याचे 100% नुकसान झाल्यामुळे तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भाजप शाखा हिमायतनगरच्या वतीने करण्यात आली आहे.
आज घडीला शेतकऱ्याच्या मागणीबाबत महाराष्ट्र सरकार गंभीरतेने घेत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. हि बाब अतयंत गंभीर असून, गोर गरीब शेतकऱ्याचे सर्व काही उध्वस्त झाल्यामुळे तात्काळ त्यांना सरकारतर्फे मदत करण्यात येणे गरजेचे आहे. यासाठी हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत देण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. भाजपा हिमायतनगर तालुक्याच्या वतीने दि.4/10/2021रोजी या संदर्भात तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार श्री तामसकर साहेब यांना भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून शाम भारती महाराज (माहुरगड) (अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष नांदेड) व किसान मोर्चा जि.सरचिटणीस नांदेड सुधाकर पाटील सोनारीकर याच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवेदन देणात आले. यासाठी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान, भाजपा उपाध्यक्ष किशनराव वानखेडे पाटील, कांता गुरू वाळके, यलप्पा गुंडेवार, शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, सुभाष माने, जलप्पा गोसलवाड, सरपंच जीवन जैस्वाल, गिरीश महाराज, चांदराव पाटील, वामनराव पाटील मिराशे, नितिन मुधोळकर, परमेश्वर सुर्यवंशी, बालाजी ढोणे, सचिन कोमावार, अजय सुंकुलवार, परमेश्वर जाधव, विनोद दुर्गेकर, गंगाधर मिरजगावे, सुरज चिंतावार, दीपक बाष्टेवाड, प्रमोद भुसाळे, अजय जाधव, गोविंद माने, विकास भुसावळे, विशाल अंगुलवार, परमेश्वर ढोले, यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.