हिमायतनगर, अनिल नाईक| काश्मीर घाटीत घडलेल्या हिंदूंच्या नृशंस हत्येचा हिमायतनगर (वाढोणा) येथील बजरंग दलच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी येथील श्री परमेश्वर मंदिर परिसरात पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे देखील दहन करण्यात आले.
काश्मीर घाटीत ५ दिवसात ७ भारतीय हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. एवढेच नाही तर नवरात्रीच्या काळात एका शीख समाजातील महिला शिक्षिकेची हि अत्यंत निंदनीय बाब आहे. या घटनेननंतर सर्वातर हिंदू संघटनांकडून नृशंस हत्येचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्त वाढोणा बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने दि ०९ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी येथील श्री परमेश्वर मंदिर समोर पाकिस्तान येथील पंतप्रधानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून महामहिम राष्ट्रपती भारत सरकारला द्वारा प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत केंद्र सरकारला एका निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात जिहादी आतंकवाद्यांचा पूर्णतः विनाश करण्याकरिता पतिष्ठानाला नं भूतो न भविष्यती असे उत्तर दयावे. तसेच काश्मीरमध्ये हिंदूंचे पुनर्स्थापना करून त्यांना सव्वाछंद जीवन जगण्यासाठी सुयोग्य व्यवस्था सुनिश्चित करावी.
कारण हिंदूंच्या काश्मीर घाटीत पुनर्स्थापण शिवाय आतंकवादावर लगाम लावणे अश्यक्य आहे. हिंदूंच्या सातत्याने निवडून निवडून होणाऱ्या नृशंस हत्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिहादी आतंकवादाच्या विरिओढ्त तीव्र प्रदर्शने केली आहेत. भारताच्या पावन भूमीला अपवित्र आणि रक्तरंजित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि भारताच्या अखंडत्वाला बाधा पोहचून तिचे तुकडे करणायचा प्रयत्न करणार्यांना कडक शिक्षक करण्यात यावी. जिहादी आतंकवादाला जश्यास तसे उत्तर देण्याची पद्धत आंम्हीही जाणतो, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचा एक एक कार्यकर्ता यासाठी तत्पर आहे. त्यामुळे आतंकवादाचा राजनैतिक हत्यार म्हणून प्रयोग करणाऱ्या जिहादी पाकिस्थानवर अंकुश लावण्याकरिता विश्व समुदायाने पुढे यावे.
बलिदानी हिंदू व शीख परिवारासोबत आम्ही व संपूर्ण हिंदू समाज आहे. असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा निषेध करताना पाकिस्तान पुरस्कृत कट्टरपंथी जिहाद्यांना न भूतो न भविष्यती असे उत्तर द्या....पाकिस्तान मुर्दाबाद.... म्हणत ह्या घटनेचा तीव्र निषेध करून पुतळ्याचे दहन करण्यात आले. या निवेदनावर बजरंग दल तालुकाध्यक्ष गजानन चायल, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक गुरु स्वामी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी अनेक हिंदू समाजचे युवक उपस्थित होते.