बारड/मुदखेड| राज्यातील महाविकास आघाडी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून ,शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल. असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. ते येथे बारड ता मुदखेड दौऱ्यावर दि. ०९ शनिवार आल्यानंतर आयोजित कार्यक्रमांत बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुका उपप्रमुख किशोर देशमुख, शिवसेना शाखा प्रमुख अशोक देशमुख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भा. च. स. सा. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्धवराव पवार, पंचायत समिती उपसभापती आंनद गादिलवाड, शामराव टेकाळे, संचालक व्यंकटराव कल्याणकर, सुभाषराव देशमुख, माजी उपसभापती सुनील देशमुख, जि प सदस्या सविता वारकड, युवक काँग्रेसचे मदन देशमुख, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, संजय मुलंगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. नवरात्र महोत्सवानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अशोक चव्हाण यांच्या हस्ते महाआरती करून कोरोना संकट मुक्तीची आराधना करण्यात आली.
तसेच अपघातात निधन झालेले युवक तुळशीदास पुरी यांच्या घरी जाऊन अशोकरावांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यावेळी पुढील उदरनिर्वाहासाठी कुटुंब प्रमुखास आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री अशोक चव्हाण दौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जय हो चा नारा देत गाव पातळीवर अशोकरावांचे जंगी स्वागत करण्यात आले. ज्ञानदीप नगर येथे नर्सिंग आठवले यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. वीरशैव बांधवांच्या वतीने संजय मुलंगे यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वागत करण्यात आले तर लहुजी नगर येथे बालाजी लोणवडे यांनी आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने मार्केट यार्ड मध्ये भव्य स्वागत करण्यात आले.
गाव पातळीवरील विकासाला प्राधान्य दिले जात असून, यामध्ये गाव पातळीवरील राजकारण, हेवेदावे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. गावासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख करताना त्या कामात स्थानिक पुढारीच अडथळे आणत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विश्वनाथ सुर्यवंशी, श्रीराम कोरे, भगवान एमले, गोपीनाथ कदम, दिलीप देशमुख, शेख युसूफ, गुलाबराव देशमुख, दिलीप कोरे, बाबूराव बिचेवार, गजानन कर्हाळे, कृष्णा देशमुख, नारायण पांचाळ, सूरज देशमुख, विनायक देशमुख, भगवान देशमुख, मनोज वसुमते, दिनकर देशमुख, मनोज देशमुख, सर्जेश देशमुख, विनोद कोरे यांच्यासह परिसरातील सरपंच उपसरपंच आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.