नविन नांदेड| नांदेड तालुक्यातील विकासात अग्रेसर असलेल्या धनेगाव ग्रामपंचायत चे संरपच गंगाधर ऊर्फ पिंटु पाटील शिंदे यांच्यी अखिल भारतीय संरपच परिषदेच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डुकर, गोपाळ पाटील ईजळीकर यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे केली आहे.
संरपच पदी नियुक्त असतांना केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय संरपच परिषदेच्या नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल दासराव हंबर्डे, रणजितसिंह कामठेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, रावसाहेब धनगे, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी बबनराव वाघमारे, अनिल पाटील बोरगांवकर, देविदास सरोदे, सचिन पाटील बेद्रीकर, मारोती पाटील शंखतिरथकर, माधव कोलगणे आदींनी सत्कार करून अभिनंदन केले तर मित्र मंडळ यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.