नांदेड| घाणीचे साम्राज्य …. नांदेड येथील चैतन्यनगर भागातील नंदीग्राम हायस्कुल, या शाळेच्या आवारात महानगर पालिकेचा पाण्याची पाईप लाईन फुटल्यामुळे शाळेच्या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे कालपासून सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास होत असून व त्यापासून त्यांना साथीरोगांचा प्रादुर्भाव पण होऊ शकतो.
शाळेच्या वतीने स्थानिक प्रशासनास अनेक विनंती अर्ज करण्यात आले आहेत तरी प्रशासन त्यावर कार्यावही करण्यास तयार नाही. संबधित अधिकाऱ्याने लवकरात लवकर याची दखल घेऊन योग्य ते निर्णय घ्यावे व शाळेचा परिसर स्वच्छ करण्यास प्रयत्न करावे अशी विनंती नंदीग्राम हासस्कूल चे अध्यक्ष श्री रमेश मिरजकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.