हभप भागवंताचार्य प.पु.विदर्भ केशरी सारंग चैतन्य महाराजांच्या वाणीत प्रवचन
हिमायतनगर,अनिल नाईक| प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. हिमायतनगर (वाढोणा) येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता मंदिर समितीचे सदस्य शिवाजी भंडारे आणि प्रमुख अतिथी डॉ राजेंद्र वानखेडे यांच्या शुभहस्ते आणि कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत अभिषेक व अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी महाआरती करून प्रसादाचे वितरण झाले, आगमीं नऊ दिवस मंदिरात कोरोनाचे नियम पळून नवरात्रोत्सवाचे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजीव रामदिनवार यांनी दिली आहे.
नवरात्रोत्सवात नित्यनेमाने दररोज सकाळी ७ आणि रात्री ७ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. दि.०७ गुरुवार ते दि.१३ बुधवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ७ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप भगवंताचार्य प.पु.विदर्भ केशरी स्वामी सारंग चैतन्य महाराज यांच्या मधुर वाणीत होणार आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसादाचे आयोजन कै. निवृत्तीराव महादजी पवार यांच्या स्मरणार्थ माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे. दि.१३ रोजी अष्टमी असल्याने महाप्रसाद होईल, दि.१४ गुरुवारी माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी १० ते ०२ वाजेच्या दरम्यान महानवमी, होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम त्यानंतर कळायचे कीर्तन संपन्न होणार आहे. दररोज सप्तसीती पाठाचे वाचन सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान पुरोहित कांतागुरु वाळके हे करतील. दि.१५ शुक्रवारी दुपारी ०४ वाजेच्या दरम्यान माता कालिंका देवी मंदिरापासून ढोल तश्याच्या गजरात भव्य अशी दसरा मिरवणूक काढून, परत कालिंका मंदिरात आल्यानंतर समारोप केला जाणार आहे.
या नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमच लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष - राजेंद्र रामदिनवार, उपाध्यक्ष - दिलीप पार्डीकर, सचिव - संजय मारवार, सहसचिव - गजानन तीप्पणवार, कोषाध्यक्ष - ज्ञानेश्वर पंदलवाड, सदस्य - धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, शरद चायल, जीवन घोगरकर, शिवाजी भंडारे, राजू जैस्वाल, आशिष सकवान, विजय मादसवार, ज्ञानेश्वर शिंदे, संजय बोड्डेवार, व नवरात्र महोत्सवाचे गजानन गुंडेवार, योगेश गुंडेवार, विनोद गुंडेवार, विष्णू रामदिनवार, सुनील बिंगेवार, गणेश रामदिनवार, सुरज दासेवार, कृष्णा गुंडेवार, मनोज मादसवार, सुदर्शन गुड्डेटवार, राजू चाटलेवार, गजानन मादसवार, विपुल दंडेवाड, सचिन ताडेवाड, लक्ष्मण ढोणे, राजूअप्पा बंडेवार, व्यंकटी पालीकोंडवार, अंकुश गुंडेवार, साईनाथ रामदिनवार, गजानन रामदिनवार, राजू राहुलवाड, गजानन गंगरपवाड, विठ्ठल गुंडेवार, जगदीश मादसवार, बालाजी रच्चेवार, पवन गुंडेवार, सोनू मादसवार, देविदास अलकटवार, तंटी गुड्डेटवार, परमेश्वर गुंडेवार, हनुसिंग ठाकूर, रामू नरवाडे, विलास वानखेडे आदींसह समस्त गावकरी मंडळीनी केले आहे. आज संपन्न झालेल्या अलंकार सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, सौ.लताबाई मुलंगे, ज्योतीताई पार्डीकर, अनिल मादसवार, गजानन चायल आदींसह परिसरातील अनेक नागरिक, महिला मंडळी मोठ्या सांख्येने उपस्थित होते.