हिमायतनगर,अनिल नाईक| येथील राजा भगीरथ विद्यालयात वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना वनांचे महत्व आणि जनजागृतीपर माहिती वनपरिक्षेत्र कार्यालय हिमायतनगरच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी मंचावर वनपरिक्षेत्र अधिकारी संध्याताई डोके, राजा भगीरथ विद्यालयाचे कमलाकर दिक्कतवार, बी आर पवार, माधुरी तिप्पनवार, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष गोविंद गोडसेलवार आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वन्यजीव हे अन्नसाखळी तयार करण्याचे काम करतात, मात्र मागील काही वर्षापासून मानवांनी त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केल्याने वन्यप्राण्यांनी गाव गावकुशीकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात आले असून, हे वाचविण्याचे काम तुम्हा युवा पिढीनां करावयाचे आहे. असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी संध्याताई डोके यांनी केले.