नवीन नांदेड| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी व हिराबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने एन.डी.41 राहुल नगर सिडको भागात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद माधवराव कांचनगिरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. डॉ.सौ.ललिता शिंदे बोकारे, नांदेड तालुका अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख असलम, कार्याध्यक्ष राजू लांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, शंकरराव धिरडीकर ,देविदास कदम,शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा प्रमुख भानुदास कोल्हे, सरचिटणीस के.एल. ढाकणीकर, वैजनाथ माने, प्रा.सुभाष वाघमारे, सहसचिव अक्षय मुपडे,अमोल शेळके, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या प्रारंभी ना. अशोकराव चव्हाण यांचा फोटो असलेला एक भव्य केक सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांच्या शुभहस्ते कापून साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मा. ना. श्री अशोकराव चव्हाण यांचे कार्य व विचार उपस्थित नागरिकांना सांगून अशोकराव चव्हाण साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तद्नंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व भव्य अन्नदान वाटप करून या भागातील जवळपास दोनशे महिला - पुरुषांना मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला. मोफत लसीकरण योजनेचे नियोजन सिडको प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल हमीद आरोग्य सहाय्यक सुरेश आरगुलवार, परिचारिका जयश्री दरेगावे, आशा वर्कर शितल लोखंडे, शीला सोनकांबळे, राजेश्वरी करडखेले, आरोग्य विवेक लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेऊन सहायता केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सचिव गणेश खंदारे भगवान जोगदंड, प्रल्हाद जोगदंड, अशोक सोनकांबळे, प्रा. शशिकांत हाटकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत हाटकर यांनी केले तर प्रदर्शन गणेश खंदारे यांनी मानले. तरी या कार्यक्रमाला ओरडतील वार्डातील बहुसंख्य महिला पुरुषांची तसेच लहान बालकांची उपस्थिती होती. नांदेड तालुका क्रागेस कमिटीचे उपाध्यक्ष भागवत शिंदे पाटील धनेगावकर, युवक काँग्रेसचे महासचिव रमेश तालीमकर, गुलाब ठाकूर, संतोष बारसे,माधव झुंजारे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने ना.अशोकराव चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.