प्रियंका गांधींना अटक केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून निदर्शने -NNL

केंद्राला काँग्रेसचा आवाज दाबता येणार नाही ना. अशाेकराव चव्हाण यांचा हल्लाबोल 


नांदेड| उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपकडून झालेल्या हिंसाचारानंतर तेथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जात असताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना याेगी सरकारने अटक केली. मात्र, शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आमचा लढा सुरुच राहील. माेदी सरकारला काँग्रेसचा आवाज अशा दडपशाहीच्या माध्यमातून दाबता येणार नाही, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी माेदी आणि याेगी सरकारवर हल्लाबाेल चढविला.

लखीमपूर खेरी येथे जात असताना योगी सरकारने देशाच्या लोकप्रिय नेत्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आयटीआय चौकांत साेमवारी (दि. चार) जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. त्या वेळी ना. चव्हाण बाेलत हाेते. या वेळी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी भाजप व याेगी सरकारच्या निषेधार्थ जाेरदार घाेषणाबाजी केली. ना. अशाेकराव चव्हाण म्हणाले, की केंद्राच्या कृषी कायद्यांविरूद्ध लोकशाही मार्गाने सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्र सरकार बळाचा वापर करून दडपू पाहते आहे. आजवर लाठ्या-काठ्यांचा वापर झाला. आता तर शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याची भयंकर घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देशातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या दडपशाहीविरूद्ध दाद मागणाऱ्या प्रियंका गांधी यांच्यासारख्या विरोधी पक्षातील काँग्रेस नेत्यांची मुस्कटदाबी सुरू आहे, त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे, त्यांना अटक झाली आहे. पण, केंद्राला काँग्रेसचा आवाज दाबता येणार नाही. शेतकऱ्यांसाठी आमचा लढा असाच कायम राहिल, असा निर्धारही ना. चव्हाण यांनी बाेलून दाखविला. 

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधान परिषद प्रताेद आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ  मंगाराणी अंबुलगेकर, महापौर माेहिनी येवनकर, विजय यवनकर, जि. प. चे शिक्षण सभापती संजय बेळगे, उपमहापाैर मसूदखान, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी, डाॅ. श्रावण रॅपनवाड, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंढेकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक अब्दुल गफार, अमित तेहरा, डाॅ. रेखा पाटील चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष कविताताई कळसकर, संजय लहाननकर, संभाजी भिलवंडे, सुषमा थोरात, भालचंद्र पवळे, व्यंकटराव मुदीराज, बालाजी कारेगावकर संजय देशमुख लहानकर, डॉ. श्रावण रॅपनवाड, प्रवक्ते संताेष पांडागळे, मुंतजीब, डॉ. माणिक जाधव, नांदेड काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. निलेश पावडे, संजय भोसीकर, दिलीप कोटगिरे, संभाजी भिलवंडे, दत्तात्रय कदम चोळखेकर, ताहेर खान पठाण, बालाजी शिंदे कारेगावकर, उद्धवराव पवार, बालाजीराव गव्हाणे, विकास पाटील देवसरकर, आनंदराव भंडारे, रंगनाथ भुजबळ, सरपंच भुजबळ, सुरेश हटकर, सुखानंद पुरी, हरजिंदरसिंग संधू , आशिष कराळे, शशिकांत हटकर, किशन कल्याणकर, सुमती व्याहाळकर, अनिताताई इंगोले, मंगलाताई धुळेकर, जेसिका शिंदे, ललिता कुंभार, अनुजा तेहरा, आशा पारवेकर, रजिया बेगम, विठ्ठल पावडे, उमेश पवळे, सतीश बस्वदे.

धीरज यादव, भालचंद्र पवळे, शंकर पुरी, राजू यन्नम, उमेश चव्हाण, प्रशांत तिडके, जगदीश शहाणे, परमेश्वर पवार, बाबू खोकेवाला, सय्यद शेर अली अब्दुल महबूबआली, हबीब, अब्दुल रशीद अब्दुल गणी, कुरेशी ,अब्दुल लतिफ अब्दुल माजिद, म.नासेर, संजय पांपटवार, राजू गोडबोले, शोएब अशफाक, यादव न. से., हबीब बागवान, शेख असलम खोकेवाला, सुभाष पाटील, ज्ञानेश्‍वर तुकाराम कल्याणकर, पांडुरंग गोलपवाड, विजयकुमार मंगनाळे, रोहिदास जाधव, शमीम अब्दुला, उत्तम लोमटे, ॲड. सुभाष कल्याणकर, भाऊसाहेब कदम, अख्तरउल्ला बेग पप्पू, बालाजी मद्देवाड, नीळकंठ मदने, अनिल पाटील बाभळीकर, प्रफुल्ल सावंत, विठ्ठल पाटील डक, राजेश्वर पावडे, रुपेश यादव, संजय वडजे, भागवत गुणाजी शिंदे, विनोद कांचनगिरे, लक्ष्मीकांत गोणे, शिवाजी पवार, अनिल कांबळे, जब्बार खान सुझात खान, भगवान जोगदंड, बाबुभाई गुत्तेदार, केशव मोकले, प्रा. कैलास राठोड, विनोद चव्हाण, गुलाब ठाकूर, प्रकाश दीपके, संघरत्न कांबळे, संजय वाघमारे, ठाकूर ,कैलास शहाणे, अमित तेहरा, उमाकांत पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यात सहभागी झाले हाेते.a

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी