पैनगंगा, लाखाडी, कयाधु नदिला महापुर येवुन नदिकाठच्या गावात, शेतात पाणी घुसले -NNL

शेतीचे पंचनामे न करता सरसकट आर्थीक मदत करावी


हिमायतनगर|
इसापुर धरणातील अतिरीक्त पाणी पैनगंगा नदि पात्रात सोडल्यामुळे पैनगंगा, लाखाडी, कयाधु नदिला महापुर येवुन नदिकाठच्या गावात, शेतात पाणी घुसले, त्यामुळे शेतातील कापनीपश्चात सोयाबीन, उभा कापुस वाहुन गेला त्या सोबत जमिनी एक ते दिड मीटरने खरडल्या आहेत, तात्काळ पुराच्या पाण्याने झालेल्या शेतीचे पंचनामे न करता सरसकट आर्थीक मदत करावी, ग्रामपंचायत मालमत्तेच्या नुकसानीचाही मावेजा देण्यात यावा अशी मागणी कामारी येथिल ग्रामस्थ, शेतकरी, ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी तहसिलदार यांचे मार्फत कृषी मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसिलदार यांचे मार्फत कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंतभाऊ पाटिल, आमदार माधवराव पाटिल जवळगावकर, यांना की,मौजे कामारी पुर बाधित शेचकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मागील सात ते आठ दिवसापासून सततच्या पावसामुळे व उर्ध्व पैनगंगा क्षेत्रातील इसापुर धरणाच्या अतिरीक्त सोडलेल्या पाण्यामुळे पैनगंगा नदिला आलेल्या महापुरामुळे शेतीचे 100% नुकसान झाले आहे.

कामारी गाव  लाखाडी व पैनगंगा नदीच्या संगमावर असल्यामुळे व इसापूर धरणाच्या तेरा दरवाजातुन झालेल्या पाण्याच्या विसर्गाचा फटका शेतीसह गावांना बसला. शेतकऱ्यांच्या शेतातील पिका सोबत जमिनीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. गावातील काही सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा आठ दिवसापासून बंद आहे. ग्रामपंचायत मालमत्तेच्या नुकसानी बरोबर शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कामारीचे सरपंच अंजनाबाई सोनुले, उपसरपंच अशोक शिरफुले, यांचेसह मा. सभापती जोगेंद्र नरवाडे.

 अॅड. विजयकुमार सोनुले, चेअरमन राजु पाटिल, विनायक देवराये, ज्ञानेश्वर पारडकर, गणेश देवराये, ज्ञानेश्वर देवराये, श्रीराम देवराये, ग्रा.प.स. संतोष देवराये, बालाजी देवराये, शिवानंद चुकारे, गोविंद शिरफुले, सुधाकर पेन्शनवार, माजी उपसरपंच पांडुरंग माने, दिलीपराव देवराये, शिवाजीराव शिरफुले, धोंडु बारडकर, गंगाधर देवराये, विठ्ठल शिरफुले, अनिल शिरफुले, राजु शिरफुले, कृष्णा चुकारे, गजानन शिरफुले, प्रशांत शिरफुले, सुंदरराव शिरफुले, दत्तराव शिरफुले आदिंनी केली आहे. नायब तहसिलदार तामसकर यांना निवेदन देण्यात आले असुन योग्य त्या कार्यवाहीसाठी वरीष्ठांकडे निवेदन पाठवुन कारवाई केली जाईल असे तामसकर यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी