हिमायतनगर| तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक ३५ लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाचे बांधकाम पूर्ण झाले असून, उद्या रविवारी याचा लोकार्पण सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनानंतर होणार आहे. अशी माहिती शिवसेना संघटक संजय काईतवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.
विदर्भ - मराठवाडा- कर्नाटक राज्यातील भटक्यांचे श्रद्धास्थान आणि तालुक्यात प्रसिद्ध व जागरूक असलेल्या मौजे बोरगडी येथील हनुमान मंदिर भक्त निवासाच्या बांधकामासाठी मागील काळात हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माधव महाराज बोरगडीकर यांच्या मागणीला अनुसरून ३५ लाख रुपयांचा निधी दिला होता. त्या भव्यदिव्य सभागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
या भक्त निवासाचा शुभारंभ सोहळा दि.०३ ऑक्टोबर रोजी हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या कार्यकाळात आमदार असताना येथील हभप माधव महाराज बोरगडीकर यांना साहेबराव उर्फ कृष्ण यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या सप्ताहात सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. एवढेच नाहीतर तालुक्यातील अनेक गावांतील मोठ मोठ्या सभागृहासाठी भरभरून निधी दिला तर काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे रस्ते असे अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात झाली आहेंत. सध्यातर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आता आमदार नसून सुद्धा त्यांनी आपल्या मतदार संघासाठी विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले आहे.
सभागृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर यांनी बोरगडी येथे भेट देऊन मारोतीरायाचे दर्शन घेतले आणि काम पूर्ण झालेल्या सभागृहाची पाहणी केली आहे. यावेळी संजय काइतवाड व इतर शिवसैनिक गावकरी उपस्थित होते. रविवारी होणाऱ्या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यास नागरिक, भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय काईतवाड यांनी केले आहे.