हिमायतनगरच्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिराची एका महिन्यात दुसऱ्यांदा दानपेटी फोडली -NNL

पाच वर्षांपासून सतत येथील दानपेटी फोडली जाते, चोरटे मात्र सापडेना

पोलिसांनी रात्रगस्त पैनगंगा नदीसह शहरात पूर्ववत सुरु करावी   


हिमायतनगर, अनिल नाईक|
येथील इच्छापूर्वर्ती वरद विनायक मंदिरातील सतत दानपेटी फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र यंदा एक महिन्यात दुसऱ्यांदा दानपेटी फोडून नगदी रक्कम आणि मंदिराच्या बोअरवर बसविण्यात आलेली पाण्याची मोटारपंप चोरटयांनी घेऊन पोबारा केला आहे. या घटनेमुळे गणेशभक्त व हिंदू बांधवाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. आतातरी या ठिकाणी वारंवार चोरी करून धार्मिक आस्था असलेल्या मंदिराचे पावित्र्य भंग करणाऱ्या या चोरट्याने पोलीस जेरबंद करून बेड्या ठोकाव्यात अशी मागणी केली जात आहे. अन्यथा चोरीच्या घटनेच्या निषेधार्त गणेशभक्ताना शहर बंद ठेऊन निषेध करावा लागेल असा इशारा दिला आहे. या चोरीच्या प्रकरणाचा पंचनामा पोलिसांनी केला असून, दिलीप पाटील लोहारेकर, रामभाऊ नरवाडे आणि गजानन चायल यांनी पोलीस ठाण्यात जाऊन रितशीर तक्रार दिली आहे. आता पोलीस या घटनेचा तपास कसा लावतील याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यावर्षी चोरटयांनी धुमाकूळ घातला असून, चोरटयांनी घरासह दुकानांना लक्ष करताना या महिन्यात मंदिराकडे मोर्चा वळविल्याचे एका महिन्यात दोनदा दानपेटी फोडून नासधूस केल्याच्या घटनेवरून दिसून येत आहे. दि.२४ सप्टेंबर गणेशोत्सव काळात आलेल्या गणेश चतुर्थी दिनाच्या मध्यरात्रीच्या अज्ञात चोरटयांनी हिमायतनगर येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिराच्या बाहेर बसविण्यात आलेली सव्वा कुंटल वजनाची मजबूत अशी दान पेटी तोडून त्यातील देणगीची रक्कम पळविली होती. एवढेच नाहीतर मंदिराबाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, मंदिराचे चैनेल गेटचे कुलूप फोडून सीसीटीव्हीच्या डेटा एकत्रित केल्या जाणारा डीव्हीआर बॉक्ससुद्धा पळविला. याची माहिती मिळताच पोलिसांनी येथे भेट देऊन तपास केला, परंतु या संदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चोरीच्या घटनेचा तपास थंडबस्त्यात पडला आहे. 


दरम्यान आज दि.१२ च्या मध्यरातरी पुन्हा अज्ञात चोरटयांनी याच इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात धुडघूस घालून दुरुस्त केलेली दानपेटी तर फोडलीच मंदिर परिसरात असलेल्या कनकेश्वर मंदिराच्या गेटचे कुलूप फोडले, आणि मंदिराच्या आवारात भाविकांना पाण्यासाठी घेण्यात आलेल्या विंधन विहिरीवरील मोटार काढून चोरून नेली आहे. मागील चॊरीच्या घटनेला महिण्याचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा चोरटयांनी मंदिरास लक्ष केले असल्याने भाविक भक्तातून चोरट्यांच्या या कृत्याचा निषेध केला जात आहे. चोरटयांनी मंदिराची दानपेटी तर फोडलीच मात्र या त्याक्षणी इतर ठिकाणाहून चोरून आणलेले शेती उपयोगी साहित्य ज्यात २ विले, २ शिवळा, एक वखराच्या फास, एक कुर्हाड असे साहित्य घटनास्थळावर ठेऊन पोबारा केला आहे. 

आता तरी पोलिसांनी या घटनेला गंगाभीर्याने घेऊन चॊरीचा तपास लावावा आणि या भागाकडे म्हणजे पैनगंगा नदीपात्रापर्यंत आणि शहरातील सर्वच प्रभागात पूर्ववत रात्रगस्त सुरु करून शहरातील नागरिकांना चोरट्यापासून संरक्षण द्यावे अशी मागणी महाविरचंद श्रीश्रीमाळ, भास्कर चिंतावार, दिलीप पाटील लोहारेकर, रामराव पाटील, रामू नरवाडे, धम्पलवार सावकार, गजानन चायल, अनिल भोरे, अनिल मादसवार, पुरोहित साईनाथ बडवे, परमेश्वर बडवे आदींसह शहरातील गणेशभक्तांनी केली आहे.


या पूर्वीही अनेकदा येथील वरद विनायक मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यानी रक्कम लंपास केली होती. एव्हीढेच नाहीतर या चोरटयांनी दोन वर्षांपूर्वी मंदिरातील सिमेंट काँक्रेटमधे जमिनीत गाडलेली दानपेटी फोडून चोरी केली होती. परंतु येथील मंदिराच्या दानपेटी संदर्भात झालेल्या चोरीच्या घटनांचा आद्यापपर्यंत तपास पोलिसांना लावाता आला नाही. या महिन्यात दोनदा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे चोरट्यानी पोलिसांना एकप्रकारे पकडण्याचे आव्हान दिले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी