नांदेड| राज्याचे माजी कृषिमंत्री तथा आ. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटना प्रणीत रयत क्रांती ऑटो संघटना जिल्हाध्यक्ष पदी राहुल ढगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीपत्र आ. खोत यांच्या व रयत क्रांती संघटनेचे युवा नेते पांडुरंग शिंदे, जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, संंगीता कोल्हे, बालाजी पांचाळ यांच्या हस्ते दि. ४ आक्टोबर रोजी नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात देेेण्यात आले. यावेळी रयत क्रांती ऑटो संघटनेचे संतोष पवार, सचिन धवसे, बालाप्रसाद कासेवार, किरण पाईकराव, सुभाष शेळके, संजय कदम, कैैलास ढगे, दिनाजी गोडबोले, अनिल पाईकराव, कैलास वाघमारे, बाळु ढगे, अमोल गजभारे, गजानन सुरसुुरवाड आदी उपस्थित होते.