आ. जवळगावकर यांनी मतदार संघातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी; शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा -NNL


हदगाव, शे.चांदपाशा|
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी आणि झाल्याने शेतकरी हतबल झाला असून  शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यथा जाणून घेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

या अतिवृष्टीमुळे मतदारसंघात हाहाकार झाला असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत मिळावी यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंबई गाठत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदार संघाचे अपडेट देऊन मदतीची मागणी केली. यावेळी महिला काँग्रेसच्या नेत्या डॉक्टर रेखाताई चव्हाण तालुका अध्यक्ष आनंद भंडारे माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील करमोडी येथील माजी सरपंच अनिल पवार जिल्हा परिषद सदस्य केसी सूर्यवंशी श्रीनिवास मस्के माजी नगरसेवक बाबू अण्णा पीच्केवर संदीप काळबांडे नगरसेवक फिरोज पठाण आनंदराव मस्के दशरथ मिजगर युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित.

तदनंतर आमदार जवळगावकर यांनी हादगाव तालुक्यातील कर्मोडी मारलेगाव तालंग उंचाडा हस्तरा धानोरा बोरगाव धानोरा रुई गोरलेगाव बाबळी बन चिंचोली आदी पूरग्रस्त ग्रस्त भागांना भेटी देऊन  शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांचा या भेटीदरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पिक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची संवाद साधून सविस्तर अहवाल जाणून घेतला. पिकाच्या आनेवारी संदर्भात आमदार जवळगावकर म्हणाले की प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे व पिकाची पाहणी न करता आणेवारी निश्चित केल्याचे निदर्शनास येताच  उपविभागीय अधिकाऱ्यांना सुधारित आनेवारी करण्याच्या प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचे आमदार जवळगावकर यांनी शेतकऱ्यांना बोलताना सांगितले.

पूरग्रस्तांची पाहणी करत असताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाली की मतदार संघातील हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली जाऊन खरडून गेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सावरण्याची वेळ असून मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळवून देण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी