हिमायतनगर,अनिल नाईक| शहरातून उमरखेडकडे जाणाऱ्या बोरी मार्ग रस्त्यावरील घारापुर फाटा ते हिमायतनगर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मला वाटते या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे, मला माहित नाही रस्त्याची परिस्थिती काय..? आहे. मात्र या संदर्भात पीडब्लू डीचे अधीक्षक अभियंता धोंडगे साहेबांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कदम कोहळीकर यांनी सांगितले.
ते पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने नदीकाठची शेती पिकाचे नुकसान झाले असल्याने पाहणी करण्यासाठी आले असता या रस्त्याने जात होते. रस्त्याची बिकट अवस्था झाल्याने ये-जा करताना रस्त्यात खड्डा कि, खड्ड्यात रस्ता हेच कळत नसल्याने चारचाकी वाहनाचे पाटे तुटण्याची भीती वाहनधारक व्यक्त करत असून, दुचाकीस्वारांना तर जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे हा रस्ता जीवघेणा बनला असल्याची प्रतिक्रिया वाहनधारक, शेतकरी पुढील गावाकडे जाणारे नागरिक करत आहेत.
या खड्डेमय रस्त्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून प्रवाशी वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि सुरक्षेची हमी द्यावी. आजवर अनेक नेत्याना नागरिकांनी संपर्क करून रस्त्याची व्यथा मांडली मात्र अद्यापहि या रस्त्याच्या दुरुस्तीला देखील मुहूर्त मिळाला नसल्याने रस्त्यासाठी नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.