महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाईच्या उपस्थितीत हिंगोली येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा
हिंगोली। शिवसंपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी साठी आलेले राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , महिला संपर्क प्रमुख माननीय ज्योतीताई ठाकरे, खा.हेमंत भाऊ पाटील व हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामगृह हिंगोली येथे आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी बोलतांना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसैनिकांना भेटण्यासाठी मी आलेला आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या मदतीसाठी धावून गेले पाहिजे तसेच आमदार संतोष बांगर यांनी कोरोना काळात रेमडीसीवीर इंजेक्शनसाठी स्वतः ची ९० लाख रुपयांची एफ डी मोडली आणि गोरगरीब जनतेला मोफत अन्न धान्य वाटप केले.
आणि 24 तास जनतेच्या मदतीसाठी उपलब्ध होते प्रत्येक शिवसैनिकांनी सामान्य जनतेची अशाच प्रकारे मदत केली पाहिजे आणि आमदार बांगर यांच्या सारखी कोरोना च्या काळात रुग्ण सेवा मलाही करता आली नाही असे गौरवोद्गार गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी आमदार संतोष बांगर साहेबांबद्दल काढले. तसेच प्रत्येक शिवसैनिकांनी गटातटाचे राजकारण न करता शिवसेना पक्ष वाढीसाठी जिवाचे रान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नागोराव जी करंडे यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी सहसंपर्क प्रमुख राजेंद्रजी शिखरे,सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे,माजी खासदार शिवाजीराव माने साहेब,जि. प.अध्यक्ष गणाजीराव बेले, माजी जि. प.उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, जिल्हा समन्वयक दिलीपराव बांगर महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते कीर्ती ताई लदनिया महिला तालुकाप्रमुख छायाताई शेळके जि. प.समाजकल्याण सभापती फकिररावजी मुंडे, परमेश्वर मांडगे, सुनील भाऊ काळे, जि. डी.मुळे,डी.के.दुर्गे, संदेशराव देशमुख.
तालुकाप्रमुख सखाराम जी उबाळे,संतोष देवकर, भानुदासरावजी जाधव,साहेबराव देशमुख, राजू भाऊ चापके,आनंदराव जगताप, अंकुश आहेर,जि. प.सदस्य विठ्ठलराव चौतमाल कृष्णा पाटील जरोडेकर अजय उर्फ गोपु पाटील विजय पाटील बोंढारे डॉक्टर रेणुका ताई पतंगे बांधकाम सभापती तथा गटनेते श्रीराम दादा बांगर , नगरसेवक सुभाषरावजी बांगर, नगरसेवक रामभाऊ कदम यांच्या सह शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.