विदर्भ- तेलंगणा - मराठवड्यातील हजारो भक्तांनि घेतले बोरगडीच्या मारोतीरायाचे दर्शन -NNL

दोन वर्षानंतर उत्सव होत असल्याने भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
चैत्र शुद्ध नवमी दि.१६ एप्रिल शनिवारी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक- मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय हनुमान.. जय श्रीराम.... बजरंग बली की जय... पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईच्या गर्तेतही मंदिर परिसरात दर्शनासाठी हजारो श्रध्दाळु भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कारण होते गत दोन वर्षांपासूनच्या कोरोना संकटाचे त्यातून मुक्ती मिळाल्यानंतर भक्तांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी सकाळी ४ वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले आहे.



प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो.....असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारोतीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी हनुमानाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने - फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात. त्याच पार्श्वभूमीवर आज बोरगडी येथील मारोती मंदिरात ३० हजाराहून अधिक भाविकांनी मारोतीरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केली आहे. वर्षासाठी दूरदूरवरून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहपरिवारसह दाखल झाले असणं, ज्यांचा नवस आहे असे भाविक हिमायतनगर शहरापासून तळपत्या उन्हात पैदल चालत येऊन हनुमंतरायाचे दर्शन घेत आपला नवस फेडताना पाहावयास मिळाले आहे. दरम्यान यात्रा उत्सवा निमित्त खेळणी साहीत्यासह सौंदर्य प्रसाधनाची दुकाने यात्रेत दाखल झाल्याने दर्शनाच्या गर्दीने यात्रा फुलली असली तरी, दुष्काळी आणि महागाईच्या परिस्थितीचे सावट यात्रेवर दिसून आले आहे. 


दि.१६ शनिवारी संकटमोचन, दुखःनिवारक श्री बजरंगबलीचा जन्मोत्सव चैत्र पोर्णीमेच्या दिवशी मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारोती मंदिरात पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात आणि हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळवकर यांच्या उपस्थितीत संपन्न पडला. मध्यरात्री ०४ वाजल्यापासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे. दि.१७ रविवारी सकाळी 10 वाजता बोरगडी येथील हनुमान मंदिरात हभप. भगवतीताई महाराज सातारकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी ०२ वाजता कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटक होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन मरावती मंदिर कमेटी आणि गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

ग्रामीण भागातही हनुमान जन्मोत्सव साजरा


तालुक्यातील मौजे सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह हिमायतनगर शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, पोलीस ठाण्याजवळील दक्षीन मुखी हनुमान मंदिर, रुख्मिणी नगर परिसरातील हनुमान मंदिर, पळसपुर हनुमान मंदिर, सवना ज, दरेसरसम, सरसम बु, मंगरुळ, वडगांव ज, आंदेगाव, कार्ला पी., पोटा बु, सिबदरा, सिरंजणी, एकंबा, पवना, टेंभी, डोल्हारी, सिरंजणी यासह अन्य छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जवळपास सर्वच मंदिरात भजन - किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मारोतीरायाच्या चरणी अर्पण करण्यासाठी लागणारे नारळ, बेलफुल, पेढा, साखरेचा पेढा आदीचे भाव गगनाला भीडल्याने भक्तांना दुष्काळात महागाईचा फटका सहन करावा सहन लागला.

दर्शनार्थी भक्तांना थंड पेयजलाचे वितरण  


विदर्भ - तेलंगाना - मराठवाड्यात ख्याती प्राप्त श्री बोरगडीच्या मारुती दर्शनासाठी हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले. तळपत्या उन्हामुळे होणारी जीवाची काहिली लक्षात घेता बोरगडी गावानजीक स्व.सलाम भाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय सुपर बीज भंडारचे संचालक अब्दुल कलीम यांच्यातर्फे करण्यात आली होती. तसेच हिमायतनगर येथील व्यापारी राजुशेठ जयस्वाल यांनी आजोबा आणि वडीलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बोरगडी येथील हनुमान दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहरानजीक गुरुकुल इंग्लिश स्कुलजवळ थंड पाणी आणि दीपक कात्रे यांनी फराळाची व्यवस्था केली होती. याचा शुभारंभ माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजय माने, योगेश चीलकावार, ज्ञानेश्वर शिंदे, दीपक कात्रे, प्रसाद तुप्तेवार, सोनू मादसवार, विनोद गुंडेवार, शंकर चाटलेवार, दत्ता यमलवार, प्रदीप कात्रे, शेख गोलू, उत्कर्ष मादसवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी