नांदेड| येथील कै.बसवंतराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ दि.२० जुलै मंगळवार रोजी कृतज्ञता पित्याची अन् सन्मान कलाकारांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील बडूर मार्गावर असलेल्या इच्छापूर्ती हनूमान मंदीर येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात बिलोली तालुक्यातील कलाकारांचा सन्मान व पित्याची कृतज्ञता.....! व्यक्त करण्यात येत येऊन विविध गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक शामराव इनामदार यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू उध्दवजी भोसले,जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,आमदार राजेश पवार,माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड,माजी आमदार सुभाषराव साबणे शंतनु डोईफोडे दैनिक प्रजावाणी नांदेड हे राहणार आहेत.
तर प्रमुख अतिथी वैजनाथराव मेघमाळे ( सेवानिवृत्त , सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था , महाराष्ट्र राज्य )गोवर्धन बियाणी ( दैनिक प्रजावाणी , नांदेड )यादवराव तुडमे ( मा.नगराध्यक्ष , न.पा.बिलोली . ) बी.पी.नरोड ( सेवानिवृत्त , वित्त व लेखाधिकारी . ) मैथिली कुलकर्णी ( नगराध्यक्षा , न.पा.बिलोली . )सुभाष पवार ( बिलोली शहर विकास कृती समिती . )विजय कुंचनवार ( बिलोली शहर विकास कृती समिती . ) दिलीप शिवाजीराव पा.खंडेराय ( बिलोली )बालाजी पेटेकर ( सुप्रसिध्द गायक ) यांची उपस्थिती लाभणार आहे.सदर कार्यक्रमास
गायक : अहेमद अरमान, सुमनबाई कोपुरवाड , शांताबाई गायकवाड , किसनबाई भेदे , नागनाथ बोदलेवाड , अमोल दावलेकर . तबला वादक : खाजाभाई शेख , फैजान शेख , देविदास शेरे , अशोक भालेराव , नागोराव डोणगांवकर ( ऑरगन ) , चंद्रकांत वाघमारे पांचपिपळीकर आदी कलावंतांचा सुमधूर कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक बसवंत शेषेराव मुंडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.