मा.मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवशी लोह्यात प्रवीण पाटलांच्या हस्ते स्वछता कामगारांना रेनकोट -NNL

पंचायत समिती परिसरात, मोंढा, मार्केट यार्डात  वृक्ष लागवड

लोहा| राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोहा कंधार भागावर विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्री असताना तत्कालीन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठ्या प्रमाणात विकसानिधी आणला .. दोन्ही कुटुंबात अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात लोहा मतदारसंघात  विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले .नगरपालिका स्वछता कामगारांना रेनकोट, पंचायात समिती, नगरपालिका, व मार्केट यार्डात प्रवीण पाटील चिखलीकर व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण  करण्यात आले.

राज्याचे खंबीर नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जिल्ह्याचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात विकास निधी आणला. युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे -चिखलीकर व भाजपा पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावाढदिवस लोहा -कंधार मतदारसंघात सामाजिक उपक्रमाने साजरा केला.पावसाची संततधार असतानाही तालुक्यातील भाजपाचे  प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.


युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नगरपालिका स्वच्छता कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच या कार्यसली परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम , नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, प स सभापती आनंदराव पाटील शिंदे, कृउबा समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर ,उपनगराध्यक्ष व भाजपा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, माजी नगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष किरण वटटमवार, जि प सद्स्य गणेशराव सावळे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, मार्केट समितीचे उपसभापती बळी पाटील कदम जानापुरीकर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी उपसभापती बालाजी पाटील कदम सावरगावकर, गटनेता करीम शेख, भाजपाचे नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष सुनील मोरे, माजी सभापती शंकर पाटील ढगे, माजी सरपंच साहेबराव काळे गुरुजी नगरसेवक दता वाले, नगरसेवक भास्कर पवार, अमोल व्यवहारे, प स सदस्य गणेशराव उबाळे, माजी सभापती आपाराव पवार, नगरसेवक  संदीप दमकोंडावार, नबी शेख, ज्ञानेश्वर भिसे, केतन खिल्लारे, माधव पाटील डोंगरगावकर , पंजाबराव देशमुख, माजी उपसभापती लक्ष्मणराव बोडके, संचालक, शिवराज पाटील भायुमो जिल्हा सरचिटणीस परमेश्वर मुरकुटे, फाजगे, भानू पाटील पवार, सूर्यकांत गायकवाड, सरपंच मंगेश क्षीरसागर माधव फाजगे, पिराजी पवार, बाळा पवार, प्रवीण धुतमल, लक्की फुलवरे, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

युवा नेते व भजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आगामी काळात या मतदारसंघात विद्यमान आमदार यांच्या विरोधात आपली भूमिका स्पस्ट केली त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातील संभ्रम दूर झाला. आणि येणारी प्रत्येक निवडणूक लढविण्यासाठी व ती जिकण्यासाठी कार्यकर्यांनी सज्ज राहावे असे आवाहन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. लवकरच त्यांच्या नेतृत्वात या राज्यात भाजपाचे सरकार येवो असा आशावाद त्यांनी व्यक्त केला त्यांच्या हस्ते नगरपालिका, पंचायत समिती कार्यालय परिसर व मोंढा यार्डात वृक्षारोपण करण्यात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी