वृक्षारोपणाने विद्यार्थ्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळेल-डी.पी.सावंत -NNL

देशमुखांचा वृक्षारोपणाचा आदर्श सर्वांनी घ्यावा



नांदेड| कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या ऑक्सीजनचे महत्व नागरिकांना पटले आहे. त्यामुळे सुभाष देशमुख चिकाळेकर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छ ऑक्सीजन उपलब्ध व्हावा या हेतूने विविध प्रकारचे, विविध रंगाचे, विविध जातीचे सुंदर अशी झाडे लावण्याचा उपक्रम हा स्तुत्य असून याचे अनुकरण सर्वांनी केल्यास सर्वांना स्वच्छ ऑक्सीजन व निरोगी आयुष्य जगण्यास मिळेल, असे प्रतिपादन माजी मंत्री डी.पी.सावंत केले आहे.

डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालय नांदेड परिसर येथे कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्थेच्यावतीने अध्यक्ष सुभाष देशमुख चिकाळेकर यांच्या संकल्पनेतून शेकडो प्रकारच्या नवनवीन वृक्षांचे वृक्षारोपण माजी मंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कै.डॉ. शंकररावजी चव्हाण जयंतीनिमित्त गेल्या 5 वर्षापासून विविध कार्यक्रमाचे आयोर्जीन करण्यात येते. यंदाही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सर्वप्रथम पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना शाल-श्रीफळ, मानचिन्ह देवून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. 

यावेळी महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, काँगे्रस जिल्हा सरचिटणीस मुन्ना अब्बास, भुमन्ना आक्केमवाड, एनजीओ संघर्ष समितीचे शिवाजी पवार लहानकर, उदय निंबाळकर, रावसाहेब शेंदारकर, डॉ.गणेश शिंदे, के.टी. तेलंग, ओएस आळणे, ए.बी.कदम, प्रभु पाटील, बळवंत शिंदे, गोविंद ठाकूर, आनंदा शिंदे, प्रल्हाद गायकवाड, अपसर अन्सारी, मधुकर जाधव, कैलास झांगडे, जेठेवाड, जगदीश उमरीकर, रंगनाथ जाधव, सचिन देशमुख, सचिन पाटील यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, राहुल गांधी विचार मंचचे कार्यकारी अध्यक्ष तथा एनजीओ संघर्ष समितीचे सुभाष देशमुख चिकाळेकर, अमोल देशमुख, अनिताताई सुभाषराव देशमुख यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रम हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचे पालन करून संपन्न झाला.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी