नांदेड| नांदेड तालुक्यातील नाळेश्वर येथील 33 के व्ही मधील पाच एमव्हीए पावर ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे या भागातील गावे आठ दिवसांपासून अंधारात आहेत.
नाळेश्वर येथील 33 के व्ही चा ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे या ट्रान्सफार्मरवर या भागातील गावे येतात. नाळेश्वर, पिंपळगाव (कोरका), वाघी, बोरगाव तेलंग, सुगाव खु., सुगाव बु., थुगाव, कोटीतिर्थ, हस्सापूर, ढोकी या भागात दर दोन तासाला वीजेचा लंपडाव होत असल्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळच्या वेळेस वीज जात असल्याने डासांनी लहान मुले, वृध्द नागरीक, महिला रात्र जागुन काढावी लागत आहे.
या भागातील नागरिकांनी कार्यकारी अभियंता यांना वेळोवेळी कळवून सुध्दा या भागात दुर्लक्ष केले जात आहे. तरी या नाळेश्वर येथील 33 के व्ही पाच एमव्हीए ट्रान्सफार्मर तात्काळ बसवावा व होणारी नागरिकांची गैरसोय दुर करावी, अशी मागणी माजी सरपंच कालिदास कोरके व या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.