जागतिक न्याय दिनानिमित्त न्यायधीश व वकील यांचा गोदावरी अर्बनच्या वतीने सत्कार -NNL


नांदेड| न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या न्यायाधीश आणि वकिलांचा गोदावरी अर्बन मल्टी स्टेट को-ऑप च्या वतीने जागतिक न्यायदिनाचे औचित्य साधून न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

न्यायव्यवस्थेमुळेच  देशात आणि जगात आज शांतता आणि समता अबाधित आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था ही सर्व सामान्यासाठीच आहे ही भावना यानिमित्ताने दृढ व्हावी या अनुषंगाने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या संकल्पनेतून आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनखाली मुख्य शाखा,सिडको आणि चिखलवाडी शाखेच्या  संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा उच्च न्या.रवींद्र रोटे,(विधि प्राधिकरण)नांदेड जिल्हा सरकारी वकील ॲड.आशिष गोदमगावकर, जेष्ठ विधीज्ञ शिवाजीराव हाके, ॲड. कुंभेकर साहेब, ॲड. परळकर साहेब, ॲड. देशमुख साहेब, ॲड. सतिश पुंड साहेब, दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल महालिंग पंदर्गे,मुख्य लेखाधिकारी विकास मांडे, ॲड. समीर कासरालीकर, अँड माने, ॲड. पाडमुख नांदेड बार काऊन्सिलचे उपाध्यक्ष ॲड.जगजीवन भेदे,ॲड. कपिल पाटील यांचा यानिमित्ताने प्रतिनिधी स्वरूपात सत्कार  करण्यात आला.

जगभरात १७ जुलै हा जागतिक न्याय दिवस साजरा केला जातो.१९९८ च्या रोम ठरवाद्वारे आंतरराष्ट्रीय न्यायची संकल्पना मांडण्यात आली. पृथ्वीतलावरील कोणत्याही भागात मानवावर होणाऱ्या सामाजिक अन्यायाविरुद्ध संवेदनशील व्हावे यासाठी कायद्याचे राज्य आणि जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक पातळीवर कायमस्वरूपी पहिलीच स्वतंत्र न्याय यंत्रणा म्हणून जागतिक न्यायालय स्थापन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी अर्बनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि सेवांची माहिती देण्यात आली.न्यायाधीश व वकील हे संविधानिक तत्वाचे पालन करून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देत असतात.त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या मागचा उद्देश आहे.या कार्यक्रमाला, गोदावरी अर्बनचे सचिव ॲड.रविंद्र रगटे,मुख्य शाखेचे शाखाधिकारी अविनाश बोचरे, सिडको शाखेचे शाखाधिकारी पंकज इंदूरकर, चिखलवाडी शाखेचे अधिकारी विजय सोनकांबळे,गजानन पाटील यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी