खेळाडू भरतीसाठी पात्र खेळाडूनी कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
केंद्र शासनाच्या आयकर विभागाद्वारे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम 8 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या इच्छूक खेळाडू उमेदवारांनी त्यांची कामगिरी प्रमाणित करुन घेण्यासाठी नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात शुक्रवार 20 ऑगस्ट 2021 पूर्वी कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह परिपूर्ण अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे. 


या जाहिरातीत ॲथलेटिक्स, जलतरण, स्ववॅश, बिलियर्डस, बुद्धीबळ, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉनटेनिस, टेबलटेनिस, शुटींग, वेटलिफ्टिींग, कुस्ती, बॉक्सिंग, ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, बॉडी बिल्डींग, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी व क्रिकेट इत्यादी खेळप्रकारामध्ये भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करुन सहभाग अथवा प्राविण्यप्राप्त केलेले खेळाडू या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी आयकर विभागाची 8 जुलै 2021 रोजीची जाहिरात पहावी, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी