नांदेड| वडिलाने मुलीला किडनी दान देऊन प्राध्यापक असलेल्या विवाहित मुलीचा प्राण वाचवून दुसऱ्यांदा कन्यादान करण्याचे पुण्य वाटून घेतले.
जवळा बाजार येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.सौ संगीता गंगाधर शिंदे यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्यांना मागील एक वर्ष डायलीसिस सुरू होते, औरंगाबाद, पुणे, नगर येथे उपचार घेऊन शुध्दा त्यांना असक्तपणा, बीपी चा त्रास, घबराट असे अनेक समस्या होत्या..नांदेड येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये डॉ. दापकेकर आणि डॉ.विजय मैदपवाड यांच्या मार्गदर्शनात डायलिसिस व उपचाराने त्या स्टेबल होऊन नेहमी प्रमाणे ड्युटी करायला लागल्या.
वडील गंगाधर शिंदे यांनी किडनी दिल्यानंतर डॉ.राजीव राठोड, डॉ.विजय मैदपवाड यांनी 9/7/21 रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली, व प्रा. संगीता शिंदे यांना जीवनदान दिले... अतिशय अवघड शस्त्रक्रिया नांदेडला डॉ.मैदपवाड व डॉ. राजीव राठोड यांच्या टीम ने उपलब्ध करून दिल्याने औरंगाबाद, पुणे, मुंबई ला नांदेड हा पर्याय मिळाला आहे.. सर्व टीमचे शिंदे परिवार व मापारी यांनी मनापासुन आभार मानले.
शुक्रवारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुलढाणा अर्बनचे मेहकर विभागाचे विभागीय अधिकारी देशमाने यांच्या सूचनेनुसार नांदेड येथील जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे व मित्र मंडळींनी त्यांना पाठबळ दिले, त्यांनी बोकारे यांच्या सह डॉक्टर इतर मंडळीचे धन्यवाद व्यक्त करून सत्कार केला.. सतीश मापारी पाटील हे बुलडाणा/लोणार येथिल नामवंत आहेत..
