शेतीला पशू व दुग्ध व्यवसायाची जोड यातूनच शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न - पालकमंत्री अशोक चव्हाण -NNL

भोकर तालुक्यातील मोघाळी, नागापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासह कांडली येथील पशू वैद्यकिय दवाखाण्याचे भुमीपूजन



नांदेड| भोकर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी येथील भौगोलिक परिस्थिती पाहून शेतीसह शेतीपूरक उद्योगांना जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टिने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यादृष्टिने संबंधित विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीला पाण्याच्या नियोजनासह पशुपालनासाठी अत्यावश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून कांडली येथे 35.15 लाख रुपये खर्चून उभारण्यात येणारे हा पशू वैद्यकीय दवाखाणा या पंचक्रोशीतील पशुपालक शेतकऱ्यांना नवी दिशा देईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत भोकर तालुक्यातील मोघाळी, नागापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि कांडली येथे पशू वैद्यकिय दवाखाण्याच्या भुमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, भोकर पंचायत समितीच्या सभापती सौ. निता व्यंकटेश रावलोड, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, उपायुक्त पशूसंवर्धन डॉ. मधुसूदन रत्नपारखी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. भुपेंद बोधनकर, पशूधन विकास अधिकारी (तांत्रिक) डॉ. अरविंद गायकवाड, पशूधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. दिपक बच्चंती, भोकरचे पशूधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 

भोकर येथील पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ही उंची वाढविल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची उपलब्धताही वाढणार आहे. याचबरोबर पिंपळढव, जाकापूर, पाकी, दिवशी, सोनारी, लघळूद, हाडोळी आदी साठवण तलावाबाबत शासन स्तरावरील प्रक्रिया सुरु आहे. भोकर येथे शंभर खाटाचे नवीन उपजिल्हा रुग्णालय, या भागातील रस्त्यांचा विकास यासाठी भरीव तरतुद करुन विकासाला चालना देण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी आमदार अमर राजूरकर आणि जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांची यथोचित भाषणे झाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी