नांदेड पाटबंधारे मंडळातील धरणात 62 टक्के पाणीसाठा -NNL

 


नांदेड| पाटबंधारे मंडळातर्गंत निम्न मानार प्रकल्पात 83 टक्के, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात (इसापूर धरण) 63.32 टक्के, येलदरी धरणात 69.57 टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात 75 टक्के इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे.

मंडळातर्गंत मध्यम प्रकल्पात 60.59 टक्के, नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात 71.65 टक्के जिल्ह्यातील 88 लघु प्रकल्पात 57.59 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातून तेलंगणा राज्यात 1 हजार 291 दलघमी पाणी वाहून गेले आहे, अशी माहिती नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता स. कों. सब्बीनवार यांनी दिली.

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 29.2 मि.मी. पाऊस -NNL

नांदेड | नांदेड जिल्ह्यात आज दुपारी पुन्हा दमदार पासू झाला असून, यामुळे नदी - नाले ओसंडून वाहू लागले आहेत. शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 29.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 360.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 23 जूलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 29.6 (361.7), बिलोली- 60.3 (437.4), मुखेड- 14.4 (318.6), कंधार-17.1 (324.6), लोहा-25.7 (362.3), हदगाव-15.9 (311.4), भोकर- 20.3 (370.8), देगलूर-31 (330.7), किनवट- 21.9 (438), मुदखेड- 37.9 (397), हिमायतनगर-55.4 (373), माहूर- 3 (284), धर्माबाद- 87.7 (427.4), उमरी- 32.3 (398.7), अर्धापूर- 10.2 (378.9), नायगाव- 42.2 (352.5) मिलीमीटर आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी