देवेंद्रजी पुनश्च मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत - आ. राम पाटील रातोळीकरांचे रोकडेश्वराला साकडे -NNL


नांदेड,अनिल मादसवार |
कोणतीही बॅनरबाजी, जाहिरातबाजी किंवा फाजील बडेजाव न करता आमदार राम पाटील रातोळीकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या नेत्याचे अभिष्टचिंतन केले. विशेष म्हणजे संपुर्ण जिल्हाभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असतानाही कार्यकर्ते व पदाधिकार्‍याांनीही आ. रातोळीकरांच्या या उपक्रमांना उत्स्फुर्तपणे दाद दिली. रोकडेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करून देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी लवकर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना केली. 

शेतकर्‍याांसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवारचे प्रणेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस. कोरोनााच्या पार्श्वभूमीवर कोणतीही बॅनरबाजी, जाहिरातबाजी, पोस्टर्सबाजी किंवा बडेजाव न करता आपला वाढदिवस साजरा झाला पाहिजे, ही देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ. राम पाटील रातोळीकर यांनीही विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची योजना आखली. नेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे, त्यांच्या हातून महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास घडावा, जनतेच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात यासाठी त्यांना पुनश्च मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना रातोळी येथील जाज्वल्य देवस्थान रोकडेश्वरांकडे केली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच हेमराज नव्हारे कृषि सहायक नायगाव, पिराजी देशमुख सरपंच प्रतिनिधी,बाळु पाटील, शिवराम मोरे,शिवराज पाटील, संजय पाटील, मनोज गुत्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फळबाग लागवड - आ. रातोळीकर यांनी फळबाग लागवडीसाठी शेतकर्‍यांना आवाहन करून स्वतः 10 एकर शेतात फळबाग लागवडीला प्रारंभ केला. आंबा, सिताफळ, पेरू आदी फळबाग लागवडीसाठी आ. रातोळीकरांनी ग्रामस्थांना प्रेरित केले. यावेळी कृषी खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.

बिलोलीत फळे वाटप- बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात आ. रातोळीकर यांच्या हस्ते फळे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. नागेश लखमावार ,डॉ सुनिल कदम ,डॉ. लवटे,ठाकूर सिस्टर, कुलकर्णी सिस्टर यांचा कोरोणा योद्या म्हणुन आ.राम पाटील रातोळीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वेळी लक्ष्मणराव ठक्करवाड, रवि पाटील खतगावकर, धोडीबा काबळे,उमाकांत गोपछडे, पाटील नरवाडे,शांतेश्वर पाटील,आबाराव संगणोड, इंद्रजित तुडमे,साईनाथ सिरोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

दुपारी नरसी येथील बसस्थानकातही आ. राम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बसचालकांना जेवनासाठीचा डब्बा आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल्स वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, परमेश्वर पाटील कुर्‍हाडे, अवकाश धुप्पेकर, अनिल पवळे, गोविंदराव तुप्पेकर, दिगंबरराव उगे यांच्यासह वाहतूक नियंत्रक, बसचालक, वाहक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडगा येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
गडगा येथे डॉक्टर आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सेवक, यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राम पाटील रातोळीकर, कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा सरचिटणीस ,शिवराज पाटील होटाळकर,जि.प.सदस्य माणिक लोहगवे, नायगाव पं.स.सभापती सौ.प्रभावतीताई कत्ते, पं.स.सदस्य परमेश्वर पाटील धानोरकर, संभाजी शेळके,अवकाश पाटील धुपेकर, शिवा पाटील गडगेकर ,महेश देशपांडे संतोष कदम हिप्परगेकर, गुलाब पाटील सोमठाणकर, टेंभुर्णी सरपंच सुगदराव पाटील, गडगा सरपंच पवळेताई, मारुती भास्करे अन्य मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी