नगरपंचायतीत राहून स्वतःची घरे भरल्यामुळे पहिल्याच पावसात विकास कामाचे पितळे उघडे - NNL

स्वतःला पुढारी म्हणवणाऱ्यांना कचऱ्याप्रमाणे उखडून फेकण्याची गरज



हिमायतनगर  (प्रतिनिधी) मागील ५ वर्षाच्या काळात नगरपंचायत अंतर्गत कोट्यवधींची विकास कामे करून स्वतःचे घेर भरणाऱ्या लोकप्रतिनिधीमुळे शहराची वाट लागली आहे. याचे उत्तम उदाहरण हिमायतनगर शहरात गेल्या तीन दिवसात झालेल्या पुराच्या पाण्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे निकृष्ट कामच उत्कृष्ट नमुना शहरवासीयांनी याच देही याच डोळा बघितला आहे. हे दृश्य पाहून जनतेने आता तरि तिसरा डोळा उघडून पाहावे आणि नगरपंचायतीत राहून विकासाच्या नावाखाली लूट करणाऱ्याना माफ न करता आगामी नगरपंचायत निवडणुकीत स्वतःला पुढारी म्हणवणाऱ्यांना कचऱ्याप्रमाणे उखडून फेकू अश्या संतापजनक प्रतिक्रिया सामान्य जनता बोलून दाखवित आहे.

नगरपंचायतच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी मागच्या पाच वर्षात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा प्रचंड भ्रष्टाचार तर केलाच आहे. पण १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील काही हप्तेही गिळंकृत केले असल्याची चर्चा आहे. पथदिवे, रस्ता कामात गेल्या पाच वर्षांत २० ते २५ कोटीचा अपहार बोगस व निकृष्ट कामे केल्याचे दाखवून झाला आहे. एवढेच नव्हे तर पदावरून पायउतार झाल्यानंतरही  कोटींच्या बोगस कामाचा सपाटा चालू ठेऊन अनेक प्रभागात मोठ्या प्रमाणात बोगस व निकृष्ट दर्जाचे कामे करुन आपल्या तुंबड्या भरुन घेतल्या गेल्या आहेत. शहरातील अनेक भागात अगोदरची नाली असतांना आलेला निधी हडप करण्यासाठी चक्क जुन्या नाल्याच्या बाजूने पाट्या लावून दत्तच्या माध्यमातून नाली बांधण्याचा नवीन विक्रम केला आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात या नाल्या व त्यावरून झाकणे तुटून लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत.



नळपट्टी, घरपट्टी तसेच फेरफार करण्यासाठी दररोज येणारा निधीही बनावट पावत्या जोडून हडप करण्याची मोहीम मागच्या पाच वर्षात राबविण्यात आली असून, बोगस बिले जमा करण्यासाठी खास व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. त्या समर्थकांच्या नावाने बिले काढून, मी नाही त्यातली.... असा प्रकार मागील पाच वर्षे नगरपंचायतची सत्ता उपभोगून नगरपंचायत डबघाईला आणणार्यांनी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आजघडीला कामगारांचा पगार द्यायला सुध्दा पैसा शिल्लक ठेवला नाही या सत्तापिपासून नेत्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करुन नगरपंचायत अक्षरशः लुटली आहे. त्यामुळे नपतील कर्मचारी आणि कामगारांचे दोन ते तीन महिण्याचे वेतन थकीत आहे.  

नपांतर्गत करण्यात आलेल्या विविध विकास कामाचे कामे अर्धवट असताना देखील बोगस बिले जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी खास व्यक्तींची नियुक्ती करून लेखापाल याना हाताशी धरून उचलण्यात आलेली आहेत. या सत्ताधार्यांनी पाच वर्षे नगरपंचायतची सत्ता उपभोगून नगरपंचायत डबघाईला आणली असून, महावितरणची देयके न भारत १.५ कोटीहून अधिकची थकबाकी करून ठेवण्यात आली आहे. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा नगरपंचायतचे उंबरवठे झिजवले असताना दादागिरी करुन बिल भरण्यास स्पष्ट नकार दिला होता. शेवटी कनेक्शन कट झाल्याने याचा फटका शहरातील नागरिकांना बसला आहे. त्यामुळे शहरातील सुजान नागरिकांनी नगरसेवकांना निवडून देताना विचार करण्याची वेळ आली आहे.



हिमायतनगर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे दरवर्षीप्रमाणे १५ लाखाचे कंत्राट काढून दर महीण्याला जवळपास दहा ते बारा लाख रुपये घनकचरा उचलण्यासाठी निधी दिला जात आहे. पण केवळ एक ते दोन लाखाचा खर्च करुन उर्वरित निधी घशात घातला जात आहे. यापूर्वी अडीच वर्षाच्या कार्यकाळात ७ लक्ष रुप्याच्या निधीतून तरी शहराची स्वच्छता चांगली होत होती असे जनता बोलून दाखवीत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करोडो रुपयाचा निधी आलेला असताना थातुर माथूर पद्धतीने स्वच्छता करून निधी हडप करण्यात आला त्यामुळे आज रोजी त्या लोकांमुळे शहरातील नागरिकाने दुर्गंधीयुक्त घाण पाणी आणि उखडून गेलेले खड्डेमय रस्ते व पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे. मागील काळात पाणी टंचाईच्या नावाखाली टैन्करने पाणी वाटप दाखवून मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पाण्यावाचून बेहाल झालेल्या नागरिकांच्या तक्रारीवरून पुढे येत आहे. नपमध्ये सत्तेत असलेल्यांची ५ वर्षाच्या काळामध्ये शहरातल्या लोकांचं घाण खायला पण मागे समोर पाहणार नाहीत अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.



अशा या नीच वृत्तीच्या लोकांनी विकास कामात केलेली हेराफेरी घाण खाऊन शहर स्वच्छ ठेवण्याचा केलेला खटाटोप पावसाळ्यात उघड पडत असलेल्या विकास कामावरून दिसून येत आहे. याला नगरपंचायतीत काही अधिकारी कर्मचारी सोबतीला आहेत त्यामुळे नागरिकांची लुट चालू आहे. मागच्या तारखेत प्लाटींग करण्यासाठी परवानगी देतांना दोन ते तीन प्लाँट दिल्याशिवाय परवानगी देण्यात येत नाही. ही बाब अनेकांना माहीत असून, दलालांच्या माध्यमातून फुकटचे प्लाँट विक्री करुन लाखो रुपये कमाई करण्याचे षड्यंत्रही चालू असल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या विकास कामासाठी उपलब्ध झालेल्या निधीत भ्रष्टाचार तर केलाच आहे. गावच्या विकासासाठी आलेला निधी हडप करुन तोच पैसा आगामी निवडणुकीत वापरायचा आणि पुन्हा आपली सत्ता निर्माण करायची असेच धोरण चालू आहे. यासाठी शहरातील सर्वच बांधवांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करून दबाव टाकून मतदान करून घेण्याच्या हेतूने युवकांना हाताशी धरून त्यांना व्यसनाधीनतेकडे वळविण्याचे काम सुरु असल्याचे सध्याच्या वातावरणावरून दिसत आहे.

निकृष्ट कामाचा खर्च पुढारी व अधिकारी कर्मचाऱयांकडून वसूल करा

नगरपंचायतीने आजपर्यंत केलेल्या विकासाच्या नावाखाली हेराफेरी व बोगसपणामुळे शहरातील अनेक कामांची अशी अवस्था झाली आहे. नाले दुरुस्तीनंतर पावसाळ्यात नालीतल्या पाण्याने रस्ते उखडले तर तेव्हा पुन्हा कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीचा खर्च संबंधित ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी आणि स्वार्थपिपासून पुढांऱ्यांकडून वसूल करावा? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रहारचे उपजिल्हाप्रमुख बालाजी बलपेलवाड यांनी व्यक्त केली आहे.



नगरपंचायत मधील सत्ताधारी लोकांनी जनसेवेचा ध्यास घेऊन नगरपंचायत मध्ये जाऊन बसल्या नंतर आपला स्वतःचा कसा विकास करता येतील. याचाच विचार केल्याचे उदाहरण म्हणजे हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत कोटीच्या कोटी रूपये शासनाकडून शहराच्या विकासासाठी आले होते. त्याच्या मध्ये असे बोगस काम करून संबंधित सत्ताधारी पक्षाचे लोक व हिमायतनगर येथील नगरपंचायतचे शहर अभियंता, नगरपंचायत मधील लोकांनी मिलीभगत करून बोगस कामाचे बिल उचलून घेतले. आणि लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई तत्काळ व्हावी व त्यांच्या केलेल्या चुकीमुळे असे बोगस काम केल्यामुळे त्यांच्याकडून सदरील कामाचा झालेल्या नुकसानीची रक्कम वसूल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी म्हणी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी