नांदेड| महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (4340) सर्व संवर्गिय संघटनेची राज्यस्तरीय ऑनलाईन सभा शनिवार दिनांक 19 जुर रोजी बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली व कार्शध्यक्ष बाबुराव पुजरवाड, विवेक लिंगराज यांच्या उपस्थित पार पडली. सभेला राज्य भरातून जिल्ह्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्यांनी आपले प्रश्न मांडले.
यामधे प्रामुख्याने कर्मचारी यांचे वेतन व पेन्शन वेळेवर होणे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणे, विनंती बदलीची 3 वर्षाची अट शिथिल करुन ती 1 वर्ष करणे, ग्रेड पे मध्ये सुधारणा करणे, वर्ग 4 मधून कनिष्ठ सहाय्यक 50: 40:10 नुसार भरणे, परीक्षा सुट बाबत पूर्ववत वयोमर्यादा 45 ची ठेवणे, एमडीएस व लेखा कर्मचारी वर्ग दोनची पदोन्नती कोट्याचे प्रमाण वाढविणे, 2005 नंतरचे कर्मचारी यांना पूर्ववत पेन्शन लागू करणे, आगाऊ वेतनवाढ पुन्हा पूर्ववत सुरु करणे आदी मागण्या शासनाने तात्काळ मार्गी लावाव्यात. अन्यथा जुलै 2021 मध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस घंटानाद आंदोलन व 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून संप पुकारण्यात येईल. अशी बलराज मगर यांनी सर्व उपस्थितांशी चर्चा करुन घोषणा केली.
सदर सभेला नांदेड जिल्हातून सिद्धार्थ हत्तीअंबिरे, धनंजय गुम्मलवाड, राघवेंद्र मदनुरकर, देंवेंद्र देशपांडे, शेख मुकरम, प्रल्हाद थोरवडे, नागेश सिंदगीकर, गणेश अंबेकर महेश लोणीकर, अल्केश शिरशेटवार, प्रदिप पोरडवार, सचिन चौंदत्ते., गोंविद गज्जेवार आदींची उपस्थिती होती.