हदगाव, शे चांदपाशा| आता भविष्य काळात आपणास 'कोरोना 'सोबत 'राहायच आहे. या करिता आपल्याला फार जागरुक राहवे लागणार आहे. कोरोना \ने अनेकांचे जीव घेतले आहे असे मत हदगाव विधानसभा क्षेञाचे आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.
ते हदगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आँक्सिजन जनरेशन प्लांन्टच्या सोमवारी करण्यात आलेल्या उदघाटन प्रसगी बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रुग्णालयाचे वैधकीय आधिक्षक व्हि.जी. ढगे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली. याप्रसंगी आमदार पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात जिल्हा नियोजनाच्या बैठकीत मी सर्वात प्रथम हदगाव शहराच्या उपजिल्हा रुग्णालयला आँक्सिजन जनरेशन प्लाँन्टची मागणी मी केली. माझ्या या मागणीला सर्वात प्राधान्य देण्यात आले. आज त्या आँक्सिजन प्लाँन्टचे उदघाटन माझ्या हस्ते होत आहे यांचा मला आनंद होत आहे.
या आँक्सिजन प्लाँन्टच्या बाबतीत मी डाँक्टराशी चर्चा केली असता ४० (चाळीस )रुग्णांना आँक्सिजन पुरवठा करु शकतो. तसेच या व्यतिरिक्त छोट्या मुलांकरिता विशेष रुग्णालयमध्ये व्यवस्था करण्यात आल्याची माहीती ही आमदार यांनी दिली. ते अत्यत भावनिक अहवान करत म्हणाले की, या जिवघेण्या करोनाने अनेकांचे जीव घेतले आहे. नागरिकांना माझी हात जोडुन विनंती आहे की, विनाकारण फिरु नका स्वताची काळजी घ्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन करा. कोरोनाच्या तिस-या लाटेला तिथेच थोपुया असे अहवानही त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला हदगाव न.पा. च्या नगराध्यक्षा ज्योति राठोड, उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनुले, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर. वैधकीय आधिक्षक डाँ व्हि जी ढगे. नगरसेवक फिरोज खान. स़दीप शिदे. विष्णु सुकळकर. आदी हजर होते. कार्यक्रमाचे शानदार सुञसंचालन टेलिमेडीसन विभागाचे एस बी तोगरे यांनी केल.
कोरोनाच्या काळात हदगाव शहरातील उपजिल्हारुग्णालयच्या डाँक्टर नर्स ब्रदर आदी कर्मचाऱ्यांनी जीवतोड मेहनत घेतली आहे. त्यांचे मणपुर्वक आभिदन करुन सागितले कोरानाच्या संदर्भात काय मदत करता येईल मी ती सर्वपरिने करीन. तसेच रुग्णांच्या नातेवाईक करिता शहरातील उपजिल्हा रुग्णालयात टीन शेड करिता लवकच मंजुरी पण मिळेल अशी हमी पण त्यांनी यावेळी दिली.
