पोलीस निरीक्षकांच्या मध्यतीने झाले तूर्तास स्थगित; कार्यवाही झाली नाहीतर तीव्र आंदोलन
हिमायतनगर, अनिल मादसवार| पैनगंगा नदीकाठावरील एकही गावचा लिलाव झालेला नसताना राजकीय वरदहस्त आणि महसूलच्या संगनमताने लाखो ब्रास रेतीचे उत्खनन करून शासनाचे नुकसान केले आहे. यास कारणीभूत असलेले मुख्य नांदल अधिकारी पंगे कारणीभूत असताना त्यांची पाठराखण करून रेती माफियांना अभय दिले जात आहे. केवळ दिखाव्यापुरते साठे जप्त करून मोठ्या साठ्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे. शॉर्टलाईटद्वारे एटीएस मोजणी करावी आणि संबंधितावर माफियांवर फौजदारी कार्यवाही करावी आणि अधिकाऱ्यास निलंबित करावे अशी मागणी तक्रार देऊन केल्यानंतरही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आज दि.१४ रोजी तहसील कार्यालयास कुलूप लावून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता. याची धास्ती घेत तहसीलदाराने पोलीस बंदोबस्त मागविला आणि पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मध्यस्तीने लेखी आश्वासनाच्या पत्राने आंदोलन तात्पुरते स्थगित झाले. असे असले तरी तात्काळ साठविण्यात आलेले हजारो ब्रशचे ढिगारे जप्त व कार्यवाही केले नाहीतर पुन्हा तीव्रस्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती दिनेश जाधव, केरबा शिरफ़ुले, लक्ष्मण वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
हि बाब आजही पैनगंगा नदीकाठावरील रेती धक्क्याच्या आजुबाजुंचे "ड्रोन कॅमेऱ्याने" चित्रण केल्यास ठीक -ठिकाणी असलेल्या रेतीचे साठे अथवा उचलण्यात आलेल्या जागेवर पसरलेल्या रेतीच्या अंशावरून स्पष्ट होते आहे. हा चोरीचा गोरखधंदा राजरोसपणे चालू असल्याची माहिती संबंधित निवेदनाद्वारे, फोनद्वारे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठ्यास लेखी व तोंडी तक्रारी द्वारे दिली. मात्र याकडे दुर्लक्ष करून आपल्या हातात आणखीनच वाढून घेतला आहे. याबाबत आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी यांनी तहसीलदार याना कार्यवाही संदर्भात वारंवार सूचना देऊनही अल्पश्या साठाव्या कार्यवाही करून कर्तव्यदक्ष पण दाखविला जात आहे. एवढेच नाहीतर छोटीशी कार्यवाही केल्यांनतर वर्तमान पात्रातून स्वतःहून बातम्या छापायला सांगून आम्ही प्रामाणिक काम करतो हे दखविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र पावसाळा कमी होताच सुरु झालेल्या या सोन्याचे अंडी देणाऱ्या रेतीच्या धंद्याकडे महसूलच्या अधिकाऱ्यांनी महिनेवारी हप्ता ठरून घेऊन चक्क शासनाला चुना लावणाऱ्या टोळीसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे बिनदिक्कतपणे वाळू माफिया वाळूची चोरी करून मनमानी भावाने गरजू घरकुलधारकांना विकत होते आणि विनापरवाना रेतीची चोरी, वाहतूक करत होते असा आरोप आंदोलनकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
अश्या तक्ररीनंतरही कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसले नाहि त्यामुळे आज आम्ही तहसील कार्यालयास कुलूप लावण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी शेकडो समर्थकांना घेऊन आलो. मात्र तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावून आणि आंदोलन कर्त्या काही मोजक्या लोकांशी बातचीत केली. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या अशवसनामुळे आम्ही हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आणि तहसीलदार साहेबानी साठे जप्त केले जातील असे आदेश संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन मागे घेऊन शासकीय कामात अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली असल्याचे आंदोलनकर्ते दिनेश जाधव, केरबा शिरफ़ुले, लक्ष्मण वाघमारे यांनी सांगून जर कार्यवाही झाली नाही किंवा आमच्या उपस्थितीत साठे जप्त करून कामारी, पिंपरी, दिघी, पळसपूर, कोठा, सिरपल्ली, डोल्हारी, धानोरा, वारंगटाकळी येथील रेतीघाटाची एटीएस मशीनद्वारे तपासणी केली नाहीतर पुन्हा आम्ही रेतीमाफियासह त्याना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या म्हणींसह अधिक तीव्र आंदोलन करू असेही पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


