तामसा येथे महामंडळ बस सुरू करण्याची राजुसिंग चौहान यांची मागणी - NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


तामसा।
तामसा नांदेड महामंडळ बस सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजुसिंग चौहान व देविदास रंगदळ यांनी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी याना निवेदन दिले.


जिल्ह्य़ातील नावाजलेली बाजारपेठ असलेल्या तामसा शहराची लोकसंख्या विस हजारांहून अधिक आहे व तामसा-नादेड,तामसा- हिमायतनगर, व तामसा- हदगाव रस्त्यावर असंख्य खेडे असल्याने नेहमीच तामस्याकडे प्रवाशांची वर्दळ असते. पण गेले काही वर्षापासून महामंडळाची प्रवासी बस तामसा-नादेड रस्त्यावर धावत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. खाजगी वाहनधारक तामसा-नादेड साठी दुपटीहून अधिक भाडे प्रवाश्यांकडून वसूल करून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत डांबून प्रवाशांना शारीरिक, मानसिक,आर्थिक त्रास देत आहेत.


तामसा येथे मोठी बाजारपेठ असल्याने व्यापारी,शिक्षणासाठी विद्यार्थि,फळ भाज्यां विक्री साठी शेतकरी असे हजारो प्रवासी दररोज ये जा करित असतात.पण महामंडळाची बस नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. हि प्रवाशांची होणारी आर्थिक लुट व शारीरिक मानसिक त्रास कमी करण्यासाठी हदगाव-तामसा-नादेड,हिमायतनगर-तामसा-नादेड अशि बस सेवा सुरू करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post