हिमायतनगर। मागील काही महिन्यापासून सवना ज गावामध्ये दारूविक्रीचा गोरखधंदा जोमात सुरु असुन, दारूचा महापूर वाहत आहे. परिणामी रोज - मजुरी करणाऱ्या महिलांना दारुड्या पतिराजाचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे वैतागलेल्या रणरागिण्या महिलांनी दि.२३ बुधवारी १२ वाजता पोलीस ठाण्यात हजार होऊन गावातील दारूचा अवैद्य धंदा बंद करा गावातील दारूविक्री कायमस्वरूपी बंद नाही झाल्यास दारूबंदीच्या विरोधात महिला एल्गार पुकारण्याचा तयारीत आहेत.
याबाबत सवीस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यातील व शहरातील काही परवानाधारक विक्रेत्याकडून हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताशी धरून अवैद्य रित्या दारू विक्रीचा गोरखधंदा चालविला जात आहे. या दारूविक्रीच्या धंद्यात काही महिला वर्गाचाही समावेश आहे या प्रकाराकडे संबंधित बिट जामदारांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महिला वर्गातून केला जात आहे. असाच कांहींसा प्रकार तालुक्यातील सवाना ज गावात सुरु आहे येथील काही लोकांकडून दारूचा धंदा केला जात असून, यासाठी हिमायतनगर येथून काही दुचाकीस्वार दारूचे बॉक्स घेऊन अतिवेगाने येता। आणि दारू आपल्या करून जातात त्यामुळे गावामध्ये रात्री बेरात्री सहज दारू उपलब्ध होत आहे दिवसभर काबाड कष्ट करून आलेले मजुरदार, शेतकरी हि विषारी दारू पिऊन आपल्या कौटुंबिक जीवनात विष घोळत आहेत त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत
त्यामुळे महिला वर्गासह बालगोपाळांचे जीवन जगणे कठीण झाले असून, दारू पिऊन आल्यानंतर नौरोबा वाटेल त्या प्रमाणात घरामध्ये धिंगाणा घालून पत्नीला मारहाण करणे,शारीरिक व मानसिक छळ करणे, मुलांना शिवीगाळ करणे यामुळे खेळत्या संसाराची राखरांगोळी होत आहे दोन ते तीन असे विना परवाना दारू विक्री करणारे विक्रेते गावात आहेत. याना गावात दारू विक्री करू नये अशी विनंती महिलांनी अनेकदा केली होती. हा धंदा काही दिवस बंद झाला, त्यानंतर पूर्ववत दारूचा व्यवसाय तेजीत सुरु झाल्याने गावात दारूचा महापूर वाहत आहे. याबाबत पोलिसांना सांगूनही काहीच फरक पडत नाही, उलट दारू विक्रेते छातीठोकपणे आम्ही पोलिसांना हप्ता देऊन धंदा करतो असे सांगत आहेत.
त्यामुळं दारुड्या नवर्याच्या त्रास महिलांना सहन करावा लागत असून, आगामी काळात हिंदू सणांची रेलचेल सुरु होणार आहे, हि बाब लक्षात घेता महिलांच्या आनंदात विरजण पडू नये म्हणून दारुविक्रीचा धंदा बंद करा अशी मागणी करत बुधवारी सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सवना ज येथील कल्पना आलेवाड, सागर जोन्नपले, रेखा राऊत, शोभा कलाने, अश्या गायकवाड, रेखा बुद्धेवाड, सुनीता काळाने, सुरेखा अनगुलवार, नंदा बुद्धेवाड, सुवर्णमाला बुद्धेवाड, रतनबाई बुद्धेवाड, भाग्यरथा ढाले, कमल अनगुलवार, विमल भुरेवाड, छाया बिल्लेवाड, अशा भुसाळे, कांता अनगुलवार, लता गोपेवाड, कमलबाई गायकवाड आदींसह अनेक महिला व युवा कार्यकर्ते यांनी पोलीस ठाणे हिमायतनगर गाठून तात्काळ दारूबंदी करा अन्यथा लोकशाही मार्गाने कायदा हातात घेऊन दारुड्याना चोप द्यावा लागेल आणि या विरोधात जिल्हाधिकारी नांदेड व उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगत महिलांना दारुड्यामुळे जीवन जगणे अवघड बनल्याचे तीव्र संताप जनक भावना व्यक्त केल्या आहेत.