मुखेड, रणजित जामखेडकर| तालुक्यातील वर्ताळा तांडा येथे मोकळ्या जागेत उभा केलेला एम.एच ११ एम ४५५९ क्रमांचा ट्रक दिनांक १३ एप्रिल च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना घडली होती. ट्रकचे मालक परशुराम घारू चव्हाण वय ४५ रा वर्ताळा तांडा ता.मुखेड यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुरंन १०९/२०२१ कलम ३७९/३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखालील मुखेड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणी आरोपींच्या मागावर जावुन २ महिने तपास करून गुन्हातील आरोपींच्या अखेर मुसक्या आवळल्या यामध्ये आरोपी असलेल्या १) गजानन पोमा चव्हाण वय २५ धंदा मजुरी रा.हारजु तांडा ता.मुखेड २) गणपत रुपला चव्हाण वय वर्षे ३४ रा. हारजु तांडा ता.मुखेड ३) परशुराम राठोड वय ४५ वर्षे धंदा मजुरी रा.सन्मूखवाडी तांडा ता.मुखेड ४)आनंदा दादाराव बद्देवाड वय २१ रा. बेळी (बु) ता.मुखेड ५) सुर्यकांत व्यंकट श्रिरामे रा.मंग्याळ ता.मुखेड या आरोपींना अटक केली असुन आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तर गुन्हातील चोरलेला माल ट्रक एम.११ एम ४५५९ ज्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये रोख आरोपींंकडुन हस्तगत केली आहे.
सदरची कार्यवाही नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,देगलूर उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेडचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे,साह्यक.पोलिस निरिक्षक संतोष केंद्रे,पोलिस उप निरिक्षक जि.डी काळे,पोलिस आमलदार सिध्दार्थ वाघमारे, गंगाधर चिंचोरे ,सचिन मुप्तेवार ,यांच्या पथकाने कार्यवाही केली असून गुन्हाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जि.डी काळे हे करित आहेत.