हिमायतनगर| भाजप तर्फे उदयाला होणार राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणार असून, या संदर्भात तालुका भाजप कार्यालय हिमायतनगर येथे चक्काजाम आंदोलन संदर्भात नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा हिमायतनगर तालुका प्रभारी अशोक नेम्मानीवार यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
राज्य शासनाची खेळी ओबीसी आरक्षणाला बळी, मराठा आणि ओबीसी आरक्षणाकडे महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे कानाडोळा होत आहे. त्यासाठी भाजपच्या वतीने राज्य व्यापी आंदोलन करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर भाजपा सर्व आघाड्या रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार आहे. यामध्ये सहभागी होऊन सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन भाजपा नेते नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा हिमायतनगर तालुका प्रभारी मा.अशोक नेम्मानीवार यांनी बेठकीत केले आहे.
ओबीसीचे समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले पूर्ववत मिळवण्यासाठी, हिमायतनगर (वाढोणा) शहर व ग्रामीण भाजप रस्त्यावर उतरत आहेत. हे आंदोलन हिमायतनगर येथे उद्या 26/6/2021 रोज शनिवार ठीक 11.00वाजता परमेश्वर कमान नांदेड -किनवट रोडवर होणार आहे. सर्व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवानी या चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावे व आपले हक्काचे रद्द झाले आरक्षण हिस्काटून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करावे सर्व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते भाजप ओबीसी मोर्चाचा सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आशिष सकवान यांनी केलं आहे.
यावेळी जिल्हा चटणीस सुधारकर पाटील सोनारीकर, शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, ओबीसी सेल ता.अध्यक्ष रामेश्वर गड्डवाड, ज्ञानेश्वर शेवाळे, मधुकर पांचाळ, दत्ता शिराणे, पवन करेवाड, अहेमद भाई, नितिन मुधोळकर, परमेश्वर सुर्यवंशी, विनायक ढोणे, बालाजी ढोणे, विनोद दुर्गेकर, गंगाधर मिरजगावे, सूरज चिंतावार, संजय कुरमे, नागोराव शिंदे, निलेश चटने, प्रमोद भुसारे, प्रदीप नराहरे, रायेवार काका व ईतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.