ओबीसी व मराठा आरक्षणासाठी भाजप मैदानात चक्काजाम आंदोलन ...NNL

केला महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा निषेध 


हिमायतनगर, अनिल नाईक| भारतीय जनता पार्टी तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने दि.२६ जून रोजी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री परमेश्वर कमानीजवळ ओबीसी समाजावर झालेल्या अन्याय आणि मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल या निषेधार्थ नांदेड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा हिमायतनगर तालुका प्रभारी अशोक नेम्मानीवार यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


ओबीसी के सन्मान मे....भाजपा मैदान मे.... आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचं... असे नारे देत भाजप तर्फे महाराष्ट्र राज्यात एकाच दिवसिय "राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन" संपन्न झाले. महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे ओबीसीचे समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले पूर्ववत मिळवण्यासाठी हिमायतनगर (वाढोणा) शहर व ग्रामीण भाजप रस्त्यावर उतरली होती.

तालुक्यातील सर्व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवानी चक्काजाम आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले हक्काचे रद्द झाले आरक्षण हिस्काटून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बाबूराव केंद्रे, अशोकराव नेमानीवार यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर भाजपाचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान यांच्याकडून चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. चक्काजाम आंदोलनात ओबीसी मराठा आरक्षणा संदर्भात व राज्यात होत असलेल्या उद्धव ठाकरे सरकारमुळे अनेक लोकांना वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत वेळोवेळी सरकारला अवगत करण्यात आले होते. पण महाविकास आघाडीचे सरकार हे कुंभकर्णी झोपेच सोंग घेऊन कारभार करत असल्याचे सर्व राज्य पाहत आहे. अशा ह्या निर्लज्ज सरकारच्या विरोधात आज पूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. त्याच धर्तीवर हे आंदोलन हिमायतनगर तालुक्यात परमेश्वर मंदिर कमान नांदेड - किनवट राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे व ओबीसी मोर्चाचे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन आंदोलन केले.


यावेळी तहसील प्रशासनाकडून चंदु राठोड व पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन, परशुराम देवकते यांना निवेदन देण्यात देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे नांदेड किनवट रोडवर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ एक तासभर ठप्प झाली होती. आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपचे तालुकाअध्यक्ष आशिषभाऊ सकवान.तालुका उपाध्यक किशनराव वानखेडे, सुधाकर पाटील, कांता गुरू वाळके, शहर अध्यक्ष खंडू चव्हाण, युवा मोर्चा ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, ओबीसी सेल ता.अध्यक्ष रामेश्वर गड्डवाड, किशोर रायेवार, चांदराव कदम, ज्ञानेश्वर शेवाळे, मधुकर पांचाळ, अहेमद भाई पठाण, भीमराव लुम्दे, गंगाधर पडोळे, दत्ता शिराणे, वामनराव पाटील मिराशे.

पवन करेवाड, नितिन मुधोळकर, परमेश्वर सुर्यवंशी, विनायक ढोणे, बालाजी ढोणे, सचिन कोमावार, सुधाकर चिठेवार, प्रकाश सेवनकर, राज गाडेकर, अजय सुंकुलवार, विनोद दुर्गेकर, गंगाधर मिरजगावे, भिमराव आडे, संजय कुरमे, निलेश चटने, प्रमोद भुसाळे, संभाजी तवर, प्रदीप नराहरे, श्याम हेंद्रे, विशाल जाधव, महेश काळे, प्रशांत ढोले, विनू किरकन, गोविंद माने, संतोष पाटील, आदींसह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी