मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि बाबूराव कोहळीकर यांची मुंबईत ग्रेट भेट -NNL

हदगाव - हिमायतनगरच्या विविध मागण्यांचे निवेदन; सकारात्मक झाली चर्चा  



मुंबई,नांदेड/हिमायतनगर, हदगाव| हदगाव -हिमायतनगर तालुक्यातील प्रमुख मागण्या सोडवण्यासाठी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिनांक 23 बुधवारी भेट घेऊन तालुक्यात करावयाच्या विकासकामांचे निवेदन मुख्यमत्र्यांना प्रत्यक्ष भेटुन दिले आहे.


हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या व कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या सोडून घेण्याबाबत लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन तालुक्यातील मागण्या सोडण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या बाबत सकारात्मक चर्चा करून समस्या सोडवु याविषयी संबंधितांना निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या व अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या यात आहेत.


पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड व कौठा तांडा येथील बहुउद्देशीय प्रकल्प गत वीस वर्षांपासून रखडला असून त्याचे काम त्वरित सुरू करणे, ज्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील गावांचा पाणी प्रश्न सुटून बरीचशी शेती सिंचनाखाली येईल. हदगाव तालुक्यातील तरोडा येथील आदिवासी गावांमध्ये साठवण तलावास मान्यता देणे. पैनगंगा नदीवरील वाटेगाव, साप्ती, तळणी या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे व त्यास मंजुरी देणे, सदर गावांना आठ महिने नदित पाण्याचा प्रवाह सुरू प्रवाहा नंतर साठवन असतांना शहराला जोडणारे दैनंदिन दळणवळणाचे रस्ते जवळचे असुनही नदिमुळे कित्येक किलोमीटरचा फेरा मारून जास्तीचे अंतर पार करावे लागते.


हदगाव तालुक्यातील निवघा बाजार परीसरातील नागरीकांच्या आरोग्याचा विचार करता महामारीमुळे अनंत अडचनींचा सामना करावा लागला येथे ग्रामीण रुग्णालय, तळणी व मनाठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करणे. पैनगंगा नदीला पावसाळ्यात पुर येतो इसापुर धरणा खालील आमच्या परीसरातील शेतकऱ्यांच अतोनात नुकसान होते, उन्हाळ्यात जेंव्हा गावांच्या पाणीपुरवठा योजना बंद पडतात, जनावरांना पाणी नसते अशा वेळी अर्ज, विनंत्या, पत्रव्यवहार करून पाणी सोडवण्याची प्रक्रिया पुर्ण करून घ्यावी लागते, नदिला तिसरा कालवा अर्थात कॅनल घोषित करून कालव्या प्रमाणे ईसापुर धरणातून पाणी पाळ्या नदीपात्रात सोडणे.


हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील खरीप हंगाम 2020 सालात सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान होऊनही कंपनीने पिक विमा मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी अडचनीत आहेत, त्याचा पाठपुरावा सुरू आहे, यात लक्ष घालुन त्वरित पिक विमा मंजूर करणे. उपरोक्त सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर त्यांनी अडीअडचणी जाणून घेऊन सर्व मागण्या सोडण्याबाबत आश्वासन दिले.


गत विधानसभा निवडणुकीमध्ये हदगाव हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी कोहळीरांना द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या एका गटाकडून होत होती, दुसऱ्या गटाकडून आष्टीकर यांना तिकीट मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, यादरम्यान रस्सी खेच होऊन शेवटी आष्टीकरांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली त्यांना जनतेनी मतातुन नाकारले, बाबुराव कदम कोहळीकर अपक्ष उभे राहून जनतेचा विश्वास संपादन करत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.


पक्षश्रेष्ठींकडून कोहळीकरांना अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु कोहळीकर तेंव्हा तटस्थ राहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना चांगला लोकाश्रय मिळाला, कोहळीकर दुसऱ्या क्रमांकावर राहुन पराभुत झाले. परंतु ते जनतेच्या मनात लोकनेते, शेतकरी नेते म्हणून आहेत, विधानसभा निवडणुकी पासून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची कोहळीकरांची बहुदा ही पहिलीच भेट असावी. या भेटीत त्यांच्या राजकीय हालचाली भविष्यातील निर्णयासह अनेक विषयावर चर्चा झाली असेलच असे म्हणायला हरकत नाही.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी